esakal | मुळक आयुर्वेदिक कॉलेजमध्ये रुग्णांसाठी १०० खाटांचे नियोजन; महापौरांनी केली पाहणी

बोलून बातमी शोधा

mahapaur
मुळक आयुर्वेदिक कॉलेजमध्ये रुग्णांसाठी १०० खाटांचे नियोजन; महापौरांनी केली पाहणी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बाधितांना बेड कमी पडत आहे. कोरोना बाधित रुग्णांसाठी नंदनवन येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिचर्स सेंटर येथे १०० खाटांचे नियोजन करण्यात येत आहे. येथे ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा प्रशासनाला दिले.

हेही वाचा: नागपूर झाले नरकपूर! लोकप्रतिनिधींच्या केवळ घोषणाच; पालिका प्रशासन आणि महापौरांत समन्वयच नाही

महापौरांनी यापूर्वी श्री आयुर्वेदिक महाविद्यालय व पकवासा समन्वय रुग्णालयाचा दौरा करुन १३६ खाटांचे रुग्णालय उघडण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले होते. शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयांना कोविड रुग्णांसाठी वापरण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुळक आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाची आज महापौरांनी पाहणी केली.

येथे ऑक्सिजनयुक्त १०० खाटांची व्यवस्था करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. पुढील दहा दिवसात व्यवस्था पूर्ण करण्यात येणार आहे. तज्ञ चिकित्सक, नर्सेसची व्यवस्था मनपातर्फे करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीही १०० बेडला हिरवी झेंडी दाखवली.

हेही वाचा: नागपूरकरांनो, लॉकडाउनच्या नियमावलीत मोठे बदल: वाचा काय राहणार सुरू आणि काय बंद

यावेळी महापौरांसोबत वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती महेश महाजन, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, कॉलेजच्या प्राचार्य डॉ. मीना अलनेवार, आरएमओ डॉ.संगीता भागडकर, समन्वयक डॉ. शरद त्रिपाठी, उपायुक्त मिलिंद मेश्राम, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुनील कांबळे आदी उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ