
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : मुंबईतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आशिष अरूण उबाळे (वय ५८, रा. मुंबई) यांनी १७ मे रोजी नागपुरातील रामकृष्ठ मठात गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी केलेल्या तपासात निर्माते आणि उधारी पैसे दिलेल्यांकडून सातत्याने छळ केल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यातून पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.