esakal | सर्वांमध्ये अवतरले रामदास आठवले आणि केल्या अश्या चारोळ्या, काय ही स्टाईल...
sakal

बोलून बातमी शोधा

Athavale's poetry style Comment on Facebook

नेहमी विविध कारणांनी चर्चेत राहणारे रामदास आठवले यांची चर्चा कोरोनाच्या काळात होत आहे. एकीकडे कोरोना दुसरीकडे रामदास आठवले असेच चित्र सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. "कोरोना गो... गो कोरोना...' म्हणणारे आठवले कमेंटच्या माध्यमातून सर्वांच्या आठवणीत राहत आहे.

सर्वांमध्ये अवतरले रामदास आठवले आणि केल्या अश्या चारोळ्या, काय ही स्टाईल...

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : केंद्रीय मंत्री रामदास आठवले तुमच्या लक्षात आहे ना... असणारच... हा कसा प्रश्‍न केला... असच काही उत्तर असेल तुमच... कारण, आठवले नेहमी आपल्या बोलण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत असतात... त्यांची बोलण्याची पद्धत अनेकांना हसवून टाकते... महाराष्ट्रात कोरोना विषाणूने पाय पसरविल्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता... यात ते "कोरोना गो... गो कोरोना...' असे बोलताना दिसले होते. यानंतर ये वाक्‍य चांगलचं फेमस झालं होत... आता रामदास आठवले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

"कवी म्हणतात : गो कोरोना गो... कवी म्हणतात : गो कोरोना गो... पोरी म्हणतात : कसला चिकना ग ह्यो', "मुलगी म्हणते तुला पाहून चडते माझ्या गालावर लाली, अगं बाई हाच माझा बाहुबली...', "गली क्रिकेटमध्ये आऊट असतो एक टप्पा, भाऊला पाहून पोरी म्हणतात हाच माझ्या सोन्याचा पप्पा...', "नाही दाढी, नाही मिश्‍या, पण भाऊची चर्चा दाही दिशा...' या ओळी वाचून तुम्हाला कुणाची तरी आठवण झाली असेलच... अर्थातच आपले कवी, लाडके कवी रामदास आठवले यांचीच...

हेही वाचा - #COVID-19 आयुक्‍त तुकाराम मुंढे नेहमी एक पाऊल पुढे, हे आहे कारण....

जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाने भारतात शिरकाव केल्यामुळे सर्वांच्या मनात भीती पसरली आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सर्वत्तोपरीपर्यंत केले जात आहेत. सरकारतर्फे लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने सर्वांना घरातच थांबावे लागत आहेत. बाहेर निघाल्यास पोलिसांचा सामना करावा लागत असल्याने काय करावं असाच प्रश्‍न त्यांचा मनात उपस्थित होत आहे. 

फावल्या वेळेत काय करावे असा यक्षप्रश्‍न नागरिकांच्या मनात उपस्थित होत असताना नोटिझन्सने जुन्या आठवणींना उजाळा देणे सुरू केले आहे. यासाठी सोशल मीडियावर जुने फोटो शेअर केले जात आहेत. जुना आणि सध्याचा फोटोत झालेला बदल बघून युवक मंडळी आपला फावला वेळ मार्गी लावत आहे. या फोटोंवर मित्रांकडून कमेंट करून दाद दिली जात आहे. ही कमेंट साधीसुधी नसून चक्‍क आठवले स्टाईलमध्ये केली जात आहे. यामुळे "या आठवले स्टाईलच्या ओळी कुठूण आणल्या बे' असा प्रशनही एकमेकांना विचारला जात आहे. 

नेहमी विविध कारणांनी चर्चेत राहणारे रामदास आठवले यांची चर्चा कोरोनाच्या काळात होत आहे. एकीकडे कोरोना दुसरीकडे रामदास आठवले असेच चित्र सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. "कोरोना गो... गो कोरोना...' म्हणणारे आठवले कमेंटच्या माध्यमातून सर्वांच्या आठवणीत राहत आहे. 


शुभम भाऊवर पोरी आहेत लट्टू 
बघतातच म्हणतात अगं बाई आला ओ माया कट्टू 

लॉकडाऊनमध्ये चालू आहे किराणा, 
मुली म्हणतात इस बंदेने करदीया हमोको दिवाना... 

ताईला नाही खुबसुरतीचा गुरूर, ताईला नाही खुबसुरतीचा गुरूर, 
ताईला बघून पोरं म्हणतात 13 13 13 सुरूर... 

घोड्याच्या गाडीला म्हणतात सगळे टांगा, 
ताईंना बघण्यासाठी लागतात लांबच लांब रांगा... 

जुन्या फोटोवर कमेंट करायचा कोणी उचलला आहे हा विडा, 
इतका कसा वळवळ करतो तुमच्यातला किडा!!! 

पाहुनी भाऊंचा किलर लुक मुली म्हणतात करू का लग्नासाठी कार्यालय बूक 
उन्हाळ्यात खावा कलिंगड, हिवाळ्यात पपीता, 
उन्हाळ्यात खावा कलिंगड, हिवाळ्यात पपीता, 
भाऊला बघून पोरी म्हणत्यात, तू माझा अय्यर, मी तुझी बबिता... 

फास्ट गाडी चालवून, मागे टाक सशाला, 
एवढ्या सुंदर चेहऱ्याला, फेअर ऍण्ड लव्हली कशाला... 

इंग्लिशमध्ये भुताला म्हणतात ड्रॅकुला 
भाऊंचा फोटो बघून मुली म्हणतात हाच माझा छकुला 

जीतनी तारीफ करो कम है, 
जीतनी तारीफ करो कम है, 
क्‍योकी फोटो आइटम बम है... 

राजाला इंग्रजीमध्ये म्हणतात किंग, 
राजाला इंग्रजीमध्ये म्हणतात किंग, 
आणि आपल्या दादाला सगळ्या पोरी म्हणतात हाच माझा रणवीर सिंग... 

क्लिक करा - नवविवाहितेने घेतली पोलिसांकडे धाव, कारण वाचून व्हाल थक्‍क...

भावा तुझा फोटो म्हणजे नांद खुळा पब्लिक गोळा 
भाऊचा फोटो वरचा लुक पाहून पोरींचा फक्त भाऊवरच डोळा 

काल भाऊला एका पोरीचा फोन आला, 
म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग, 
म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग, 
भाऊ म्हणे टोकन घे आणि लाईनमध्ये लाग... 

पेढे बनवायला नेहमी लागतो खवा... 
सगळ्या पोरींची डिमांड आम्हाला फक्त हाच चिकना हवा... 
भाऊच्या चड्डीत घुसली मुंगी... 
अख्या पोरी म्हणतात.. 
मै इसके साथीच लगीन करूंगी... 

गावात असते प्रत्येक घराला आंगण, 
गावात असते प्रत्येक घराला आंगण, 
भाऊला पाहून पोरी म्हणतात, 
हाच धुईन माझ्या पोराचं ढुंगण 

भाऊनी फोटो टाकल्यावर मार्केट मंद आणि धंदा बंद 
आंटी सगळ्या म्हणतात... आला गं माझा देवानंद... 

पाळण्यात बसून घेत होतो झोका.. 
भाऊचा फोटो पाहून ऐश्‍वर्या ने दिला सलमानला धोका... 

त्या दिवशी पडला होता पाऊस... 
पोरी म्हणता आग बाई कसा दिसतोय माझा मिकी माऊस... 

दोन किलो बर्फ हंड्यात टाकून हंडा भर पाणी केला गार... 
पोरी भाऊचा फोटो बघून करतात हातावर सपासपा ब्लेडने वार... 

नाही सोन नाही चांदी, मुलगा आहे हिरा, 
मुलाचं एकच डाएट, वांग्याची भाजी नं गप गप शिरा... 

"वास्तव'मधला संजय दत्त आहे फिका 
"वास्तव'मधला संजय दत्त आहे फिका 
आणि गल्लीतल्या पोरी सारख्याच म्हणतात "घेऊ का मी ह्याचा मुका'... 

पोरी भाऊचे लाडाने ओढतात गाल, 
भाऊ पोरींना बघून म्हणतो 
"गाडी वाला आया घर से कचरा निकाल' 

डब्बे में डब्बा, डब्बे में दही 
डब्बे में डब्बा, डब्बे में दही 
भाऊ बुलाती है मगर जाने का नही... 

भाऊ आमचा खुंखार वाघ, 
भाऊ आमचा खुंखार वाघ, 
वाघाने धरला ससा, 
भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनी कापल्या नसा... 

वांग्याचा केला रस्सा, पापड केला फ़्राई, 
ताई भाव देणार नाही, कितीही करा ट्राई... 

loading image