

ATM Scam in Nagpur: एटीएममशीनमधून विविध मार्गांनी पैसे लुटण्याचे प्रकार आत्तापर्यंत घडले आहेत. यानंतर आता चोरट्यांनी यासाठी एक नवा फंडा वापरला आहे. यामध्ये एका अॅल्युमिनिअमच्या पट्टीचा वापर करुन ग्राहकांची दिशाभूल करत ते पैसे चोरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.