तिघींच्या इभ्रतीशी केला खेळ; पत्नीचे अश्‍लील फोटो टाकले घाणेरड्या पेजवर

तिघींच्या इभ्रतीशी केला खेळ; पत्नीचे अश्‍लील फोटो टाकले घाणेरड्या पेजवर

नागपूर : लॉकडाउन (lockdown) असल्यामुळे तरुण व तरुणी मोबाईलवर गुंतलेले असतात. इंस्टाग्राम, फेसबूक आणि व्हॉट्सॲपवरून ‘हाय-हलो’ नंतर झालेल्या फ्रेंडशिपने अनेक तरुणींचा घात झाला. अनेकांना फेसबूक फ्रेंडने दगा दिला. अशाच एका घटनेत युवकाचे तरुणीचे अश्‍लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल (bad photos go viral on social media) केले तर एकाने स्वतःच्या पत्नीचेच फोटो आणि मोबाईल क्रमांक फेसबुकच्या पॉर्न पेजवर टाकल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी सोनेगाव, धंतोली आणि नंदनवन पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. (Atrocities-on-three-girls-in-Nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनेगाव परिसरात राहणारी २५ वर्षीय महिला रिया (काल्पनिक नाव) हिचे चार वर्षांपूर्वी नागपुरातील युवकाशी लग्न झाले. दोन वर्षे संसार केल्यानंतर रियाला सासरी त्रास दिला जात होता. त्यामुळे २०१९ मध्ये रिया सोनेगावात राहणाऱ्या आईकडे राहायला आली. पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यामुळे तिला पती नेहमी त्रास द्यायला लागला.

तिघींच्या इभ्रतीशी केला खेळ; पत्नीचे अश्‍लील फोटो टाकले घाणेरड्या पेजवर
ऑनलाइन शिक्षणासंदर्भात चिमुकलीने मुख्याध्यापकांना लिहिले पत्र; सर...

ती पतीचे फोन उचलत नव्हती. तिने एका ब्युटी पार्लरमध्ये काम करणे सुरू केले. तिच्या संशयित पतीने पत्नीचे फोटो मॉर्फ करून फेसबुकच्या पॉर्न पेजवर टाकले. तसेच तिचा मोबाईल क्रमांकही टाकून ‘फ्री टू टॉक’ आणि आणखी काही घाणेरडे लिहिले होते. तिच्या नातेवाइकांनी ही बाब रियाच्या लक्षात आणून दिली. याप्रकरणी रियाच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घटना दुसरी

धंतोलीत राहणारी २८ वर्षीय तरुणी स्विटी (काल्पनिक नाव) ही नर्स आहे. तिची २०१६ मध्ये पुष्पेंद्र यादववंशी (२८, रा. बदायू-दिल्ली) याच्यासोबत फ्रेंडशिप झाली. त्याने प्रेमाच्या जाळ्यात स्विटीला अडकवले. २०१८ ला तिच्या भेटीसाठी तो दिल्लीतून नागपूरला आला. त्याने रामण सायन्स केंद्राजवळ नेऊन अश्‍लील कृत्य करीत मोबाईलने फोटो काढले. त्यानंतर दोघांचे बोलणे सुरू होते. यादरम्यान त्याने स्विटीला अश्‍लील फोटोंची मागणी केली. मात्र, स्विटीने नकार दिला. त्यामुळे त्याने तिचे अश्‍लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी स्विटीच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तिघींच्या इभ्रतीशी केला खेळ; पत्नीचे अश्‍लील फोटो टाकले घाणेरड्या पेजवर
नागपूरकरांनो, संपूर्ण अनलॉक नाहीच! वाचा काय असणार सेवांची नवीन वेळ

तिसरी घटना

नंदनवनमध्ये राहणारी १४ वर्षीय मुलगी बाजारात जात होती. दरम्यान वस्तीत राहणारा शेख शमीम (१८) याने तिचा पाठलाग केला. रस्त्यात तिच्याशी अश्‍लील चाळे करून पळून गेला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

(Atrocities-on-three-girls-in-Nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com