तिने दिला देहव्यापारास नकार अन् बदनामी करण्याची धमकी देत केला बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape Logo

तिने दिला देहव्यापारास नकार अन् धमकी देत केला बलात्कार

नागपूर : खासगी कंपनीच्या कार्यालयात महिला कर्मचाऱ्यावर कार्यालयातील अधिकाऱ्याने बदनामी करण्याची धमकी देऊन बलात्कार केला. या प्रकरणी निरज श्रीवास्तव याच्यासह तिघांवर प्रतापनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय महिला रिया (काल्पनिक नाव) हिला सहा वर्षांचा मुलगा आहे. तिला जुलै २०२१ मध्ये आयटी कंपनी झेड सोल्यूशन येथे डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून नोकरी लागली. तेथे तिच्याकडून सट्टा-मटका, ऑनलाइन लॉटरीचे गैरकायदेशिर कामे करवून घेतले जात होते. तसेच हवालाच्या पैशाचाही व्यवहार या कंपनीच्या कार्यालयातून चालत होता, आरोप रियाने केला आहे.

त्याच कार्यालयात १६ ते २१ वर्षे वयोगटातील काही तरुणी काम करीत होत्या. त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेतला जात असल्याची चर्चा होती. त्यामुळे आरोपी निरज श्रीवास्तव याने रियालाही एस्कॉर्ट सर्व्हिस देण्याची ऑफर केली. मात्र, तिने हे काम करण्यास नकार दिला. ३० ऑगस्टला महिलेच्या पर्समध्ये मीडियाचे ओळखपत्र सापडल्याने कार्यालयातील स्टाफ विजेश ऊर्फ गोलू, सचिन कर्नाके आणि इतर सदस्यांनी तिची मालक अजय बागडीकडे तक्रार केली. त्याने तिला दमदाटी करीत गप्प बसण्यास सांगितले. गडबड केल्यास तुला रस्त्यावरून उचलून नेऊन बलात्कार करण्याची धमकी श्रीवास्तवने दिल्याचा आरोप महिलेने केला आहे.

भीतीमुळे तिने काम सोडण्याचा निर्णय घेतला. १७ सप्टेंबरला शुक्रवारी दुपारी तीन वाजता महिलेला गोपालनगरातील कार्यालयात बोलावले. कार्यालयात कुणी नसताना निरज श्रीवास्तवने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. कुणालाही सांगितल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली तसेच जगदीश जोशी आणि अमित नावाच्या व्यक्तींकडून बदनामी करण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. २३ ऑक्टोबरला धरमपेठमधील कार्यालयात मंगेश नावाच्या सहकाऱ्यासह गेली असता महिलेचे नीरजने लैंगिक शोषण केले तर गोलू याने जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच जगदीश जोशी याने बदनाम करण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने लावला आहे.