
नागपूर : सलाम न केल्यामुळे संतप्त झालेल्या गुंडाने एका तरुणाला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. गोपाल विजय देशकरी (२५) रा. सहयोगनगर असे जखमीचे नाव आहे.
शनिवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या वेळी जखमी गोपाल हा त्याचा मित्र धीरज पंचारियासोबत पाटणकर चौकातील अजय पान शॉपजवळ बसला होता. त्यावेळी तेथे गोपालच्या ओळखीचा कुणाल उर्फ रायडर कृष्णा खडसे (२२) अंगुलीमालनगर हा तेथे आला.
कुणालला पाहून गोपालने त्याला त्याचे नाव घेऊन आवाज दिला. त्यामुळे कुणालला राग आला. ‘तू मला सलाम का केला नाही’ असे बोलून कुणाल व त्याच्यासोबत असलेल्या दोन विधी संघर्षग्रस्त मुलांनी गोपालला हातबुक्कीने मारहाण केली. एवढ्यावरच कुणालचे समाधान झाले नाही तर त्याने चाकू काढून गोपालच्या गळ्यावर मारण्याचा प्रयत्न केला.
गोपालने वार चुकविल्याने तो वार त्याच्या डाव्या डोळ्याजवळ लागून तो जखमी झाला. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून कुणाल या गुंडास अटक केली. कुणाल हा कुख्यात गुंड असून त्याच्याविरोधात कपिलनगर पोलिस ठाण्यात ४ गुन्हे दाखल आहेत. मागील महिन्यात तो ३०७च्या एका प्रकरणातून कारागृहातून जामीनावर आल्याची माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.