डिफेन्स परिसरात घुसण्याचा प्रयत्न; सैनिकाच्या ओळखपत्राचा गैरवापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

misuse of Indian soldier identity card
डिफेन्स परिसरात घुसण्याचा प्रयत्न; सैनिकाच्या ओळखपत्राचा गैरवापर

डिफेन्स परिसरात घुसण्याचा प्रयत्न; सैनिकाच्या ओळखपत्राचा गैरवापर

नागपूर : एका कॅब चालकाने (Cab Driver) सैनिकाच्या ओळखपत्राचा गैरवापर करीत (Misuse of soldier identity card) डिफेन्सक्वॉर्टर परिसरात (Security and Defence Quarterly)अनधिकृतरित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेक पोस्टवरील सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. याप्रकरणी एमआयडीसी (MIDC) पोलिसांनी आरोपी कॅब चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.ही घटना एमआयडीसी हद्दीतील डिफेन्स क्वॉर्टर परिसरात ९ डिसेंबर २०२१ रोजी घडली होती. घटनेनंतर डिफेन्स सुरक्षा यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली होती. सुरेंद्र भाऊराव राऊत (५० रा. प्लॉट नं. ११, वडधामना, अमरावती रोड) असे आरोपी कॅब चालकाचे नाव आहे. ईश्वरदास कौशिक गायकवाड (५५) रा. घर नं. ६६२/बी.एच. रमाबाई आंबेडकरनगर, जयताळा असे फिर्यादीचे नाव आहे.

हेही वाचा: कोरोना होम टेस्टमध्ये 3549 पॉझिटिव्ह - किशोरी पेडणेकर

भारतीय सैन्यातून वर्ष २०१६ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर ते डिफेन्स परिसरात सुरक्षा रक्षक पुरवठा करणाऱ्या जोशी सिक्युरीटी एजंसीत पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या अंतर्गत ६० सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. डिफेन्सच्या बाहेरील परिसरात ते सुरक्षेची जबाबदारी सांभाळतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ डिसेंबर २०२१ ला एमआयडीसी चेक पोस्टवर ए. एम. मेश्राम व नरेश एन. शिल्ड हे दोन सुरक्षा रक्षक कार्यरत होते. दरम्यान दुपारी २ ते २.३० च्या सुमारास चेक पोस्ट गेटवर (एमएच-४०/बी.एल./३०९६) क्रमांकाची कॅब आली. कारमध्ये चालकासह पाच जण होते. यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांची कार रोखली असता आरोपी राऊत यांनी आपण सेवानिवृत्त सैनिक सांगितले व जवळील ओळखपत्र दाखविले.

हेही वाचा: UP निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, योगींचा मतदारसंघ ठरला

मात्र हे ओळखपत्र सेवानिवृत्त सैनिकाचे नसून ते सध्या कार्यरत सैन्य दलातील सैनिकाचे होते. यावेळी सुरक्षा रक्षकांनी नाव विचारले असता चालकाने राऊत असल्याचे सांगितले. ओळखपत्रावरील नाव आणि सांगितलेल्या नावातील तफावत बघता त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी कॅबला चेक पोस्ट गेटवर रोखून धरले आणि आपल्या वरिष्ठांना याची सूचना दिली.

चालक कारसह फरार

सुरक्षारक्षकांची हालचाली बघून ओला चालक घाबरला आणि त्याने तेथून काढता पाय घेतला. अचानक ओला चालक हा कारसह पसार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. शेवटी फिर्यादी गायकवाड यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी आरोपी राऊत यांच्याविरुद्ध कलम १७०, १७१ भादवी अन्वये गुन्हा दाखल केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top