esakal | रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी ऑटोचालकाने घेतला हा निर्णय, मात्र सुरक्षारक्षकाने केले हे...
sakal

बोलून बातमी शोधा

The automaker made the decision to save the life of the patient, but the security guard made this ...

ऑटोचालकाला ऑटो पार्किंग करण्यास मज्जाव केल्याने सुरक्षा रक्षक आणि ऑटोचालक यांच्या शाब्दिक वाद झाला. मात्र, सुरक्षा रक्षकाने कोणताही विचार न करता थेट मारहाण करण्यास सुरवात केली. सुपर स्पेसालिटीत डॉक्‍टर, सुरक्षा रक्षक सारेच संतप्त होतात, आणि मारहाण करतात. डॉक्‍टर आणि सुरक्षा रक्षक यांच्यावर कोणताही अंकुश नसल्यानेच असे प्रकार होत असल्याची जोरदार चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी ऑटोचालकाने घेतला हा निर्णय, मात्र सुरक्षारक्षकाने केले हे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  सुपर स्पेशालीटी रुग्णालयात मंगळवारी दोन मारहाणीच्या घटना घडल्या. सकाळी दहाच्या सुमारास एक ऑटोरिक्षा चालक सवारीसाठी सुपरच्या पोर्चमध्ये आला. मात्र येथे येण्यास सुरक्षा रक्षकाने मज्जाव केला. मात्र रुग्णाला घेण्यासाठी आलो असल्याचे कारण सांगूनही सुरक्षा रक्षकाने ऑटोचालकाला मारहाण केली. तर दुपारी प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरने कर्मचाऱ्याला मारहाण केली.

अवश्य वाचा - हायजॅक विमानातून प्रवाशांची सुटका; पाच दहशतवाद्यांचा खात्मा

ऑटोचालकाला ऑटो पार्किंग करण्यास मज्जाव केल्याने सुरक्षा रक्षक आणि ऑटोचालक यांच्या शाब्दिक वाद झाला. मात्र, सुरक्षा रक्षकाने कोणताही विचार न करता थेट मारहाण करण्यास सुरवात केली. सुपर स्पेसालिटीत डॉक्‍टर, सुरक्षा रक्षक सारेच संतप्त होतात, आणि मारहाण करतात. डॉक्‍टर आणि सुरक्षा रक्षक यांच्यावर कोणताही अंकुश नसल्यानेच असे प्रकार होत असल्याची जोरदार चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

अनेकदा प्रवेशद्वार उघडण्यावरून खटके उडत असतात. येथील तैनात सुरक्षा रक्षक डॉक्‍टरांसाठी येथील प्रवेशद्वार उघडतात. मात्र रुग्णांसाठी प्रवेशद्वार उघडत नाही. अशाप्रकारे पक्षपात होतो. पूर्वी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे सुपरला वेढा मारून समोरच्या प्रवेशद्वारातून येत असत. परंतु त्यांनी मध्ये असलेले प्रवेशद्वार उघडा, असे कधीच सांगत नव्हते.

सद्या हे सुरक्षारक्षक डॉक्‍टरांसाठी प्रवेशद्वार उघडतात, परंतु रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी उघडत नाही, यामुळे येथे कधी वादाला तोंड फुटेल हे सांगता येत नाही. प्रवेशद्वार बंद ठेवण्याची वेळ दिली आहे. त्या नियमाचे पालन करावे. पालन होत नसल्यानेच अशा मारहाणीच्या घटना घडतात.