Bacchu Kadu Leads Highway Protest BJP MLA Held by Agitators for Four Hours Then Released After Assurance

Bacchu Kadu Leads Highway Protest BJP MLA Held by Agitators for Four Hours Then Released After Assurance

Esakal

बच्चू कडू अन् आंदोलकांच्या तावडीत सापडले भाजप आमदार; 4 तास बसवून ठेवलं

शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्त्यांनी हैदराबाद महामार्गावर ठिय्या मांडला आहे. यात भाजप आमदार आंदोलनकर्त्यांच्या तावडीत सापडले होते. त्यांना चार तास आंदोलनस्थळी बसावं लागलं.
Published on

शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन सुरू केलंय. आंदोलनकर्त्यांनी हैदराबाद महामार्ग आणि तिथून समृद्धी महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर ठिय्या मांडला. यावेळी भाजपचे आमदार या मार्गावरून जात असताना तेही आंदोलनात अडकले. भाजप आमदारांच्या वाहनाला सुरक्षा रक्षक नजर चुकवून नेत असताना आंदोलकर्त्यांनी त्यांना घेरलं आणि आंदोलनात बसायला भाग पाडलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com