
नागपूर : आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशातील विविध बँकांमध्ये ३६,३६१ कोटी रुपयांची १.७९ लाख फसवणुकीच्या प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकारांतर्गत उपलब्ध करून दिली आहे. ही आकडेवारी भारताच्या बँकिंग व्यवस्थेतील असुरक्षितता दर्शविणारी आणि ग्राहकांची चिंता वाढविणारी आहे.