esakal | रेल्वेतून पार्सल पाठवताय्‌ जरा सावध व्हा, हे प्रकार वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

Be careful while sending parcels by train

खासगीकरणामुळे गत काही काळापासून या व्यवस्थेत अडचणी निर्माण झाल्याचे जाणवत आहे. पार्सल रेल्वेमार्फत पाठविले जात असले तरी ते रेल्वेत चढविणे आणि उतरविण्यासाठी खासगी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे.

रेल्वेतून पार्सल पाठवताय्‌ जरा सावध व्हा, हे प्रकार वाढले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : रेल्वेतून पाठविलेल्या पार्सलमधील साहित्य गहाळ होत असल्याचे प्रकार सतत पुढे येत असून, त्यामुळे माल पाठविणाऱ्या व्यावसायिकांच्या जीवाला घोर लागला आहे. या प्रकारामुळे रेल्वेची प्रतिमाही मलीन होत आहे.

एका ठिकाणचा माल दुसऱ्या ठिकाणी निर्धारित वेळेत आणि कमी खर्चात पोहोचविणारे साधन म्हणून अनेक व्यावसायिक रेल्वेवर विश्‍वास टाकतात. रेल्वेच्या पार्सल विभागाकडून ही जबाबदारी चोख बजावली जाते. मात्र, खासगीकरणामुळे गत काही काळापासून या व्यवस्थेत अडचणी निर्माण झाल्याचे जाणवत आहे. पार्सल रेल्वेमार्फत पाठविले जात असले तरी ते रेल्वेत चढविणे आणि उतरविण्यासाठी खासगी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. नागपुरातही लोडिंग-अनलोडिंगसाठी खासगी कंपनी नियुक्ती आहे.

अवश्य वाचा : बापच मुलीला म्हणायचा, 'इतर माणसांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडील' अन्‌...

एका ठिकाणाहून पाठविलेले पार्सल दुसऱ्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी थेट व्यवस्था नसल्यास मधल्या स्थानकावर पार्सल उतरवून घेतले जाते. नंतर संबंधित स्थानकाकडे जाणाऱ्या रेल्वेतून हे साहित्य पुढे रवाना केले जाते. नागपूर हे देशाच्या मध्यभागी असणारे स्थानक असल्याने देशाच्या एका कोपऱ्याहून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पाठविलेले पार्सल बरेचदा नागपुरात उतरवून घ्यावे लागते. लोडिंग-अनलोडिंगच्या प्रक्रियेदरम्यान साहित्याची आदळआपट होऊन सील तुटते. त्यातून काही माल बाहेर पडतो. याप्रकाराने व्यवसायिकाचे मात्र नुकसान होते.

साहित्य गहाळ झाल्यासंदर्भात अलीकडेच एक तक्रार नागपूर विभागाला प्राप्त झाली. यापूर्वी मे महिन्यातही रेल्वेतून पाठविलेल्या 50 पीपीई किट्‌सचे पार्सलच बेपत्ता झाल्याची बाब समोर आली होती. या प्रकाराची तक्रार रेल्वेकडे नोंदविण्यात आली होती. प्रारंभी त्याची दखल घेतली गेली नाही. पण, थेट रेल्वेमंत्र्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचले आणि चांगलीच बोंबाबोंब सुरू झाली.

हेही वाचा : हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य

प्रकरण अंगलट येण्याची शक्‍यता निर्माण होताच पीपीई किट्‌सचा शोध सुरू झाला. बऱ्याची धावपळीनंतर पीपीई किट्‌स पार्सल ऑफिसमध्येच पडून असल्याचे समोर आले. बरेचदा व्यावसायिक कठोर भूमिका घेत नाही. यामुळे सामान गहाळ होण्याच्या अनेक घटना दबून जातात. पण, त्यामुळे रेल्वेची प्रतिमा डागाळली जाते.

loading image
go to top