
नागपूर : नागपूर जिल्हा कोरोनाच्या समूह संसर्गाच्या शिखरावर जाऊन पोहोचला आहे. प्रचंड वेगाने वाढत असलेल्या कोरोना विषाणूच्या लागणग्रस्तांचा आतापर्यंतचा आकडा एक लाख ६८ हजार २५० वर पोहोचला. मात्र, दुसऱ्या टप्प्यांतील सर्वाधिक उच्चांक गाठणाऱ्या बाधितांची नोंद २४ तासांत झाली आहे. तब्बल २ हजार २६१ जणांना कोरोनाचा विळखा बसला आहे. तर ७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. मृत्यूचा आकडाही ४ हजार ४४७ झाला आहे. कोरोचा वाढत्या उद्रेकाने प्रशासनाची चिंता वाढवली आहे.
नागपूर जिल्ह्यात १३ सप्टेंबर २०२० रोजी २ हजार ३४३ कोरोना बाधितांचा उच्चांकी आकडा आढळून आला होता. यावेळी दर दिवसाला पंधराशेच्या जवळपास रुग्ण आढळून येत होते. मात्र, अलीकडे दर दिवसाला दोन हजाराच्या जवळपास रुग्ण आढळून येतताहेत. पुढे ऑक्टोबरपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा वाढत असतानाच अचानक १३ मार्च रोजी ८ हजार ८४१ चाचण्यांमध्ये तब्बल २ हजार २२६१ जण कोरोनाबाधित आढळून आले. दुसऱ्या टप्प्यातील हा नवा उच्चांक आहे. कोरोनाच्या या प्रादुर्भावामुळे गरिबांना सरकारी तर सधन लोकांना खासगी रुग्णालया शिवाय पर्याय उरला नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
शनिवारी दिवसभरात ७ हजीर ९३५ शहरात तर ग्रामीण भागात ३ हजार ०८४ अशा एकूण ११ हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यात आढळून आलेल्या २ हजार २६१ बाधित आढळले. यात शहरातील १ हजार ८४४ तर ग्रामीण भागातील ४१५ व जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. शहरातील ८६३ व ग्रामीणमधिल १५९ अशा एकूण १ हजार ०२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ४८ हजार ३८० वर गेली आहे. रुग्ण बऱ्या होण्याचे प्रमाण ८८ टक्क्यांवर आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंमध्ये शहरातील २, ग्रामीणमधिल ३ व जिल्ह्याबाहेरील ३ असे ७ जण कोरोनामुळे दगाविले. जिल्ह्यात सद्या १५ हजार ४२३ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. यातील ४ हजार ३१७ जणांना सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे आहेत. ते शासकीय, खासगी रुग्णालये व सीसीसी मध्ये दाखल आहेत. कोरोनाचा प्रकोप नियंत्रणात होता, त्यावेळी मेयो, मेडिकल, एम्ससह इतर शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या २०० वर आली होती. मात्र रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने मेयो, मेडिकल आणि एम्समध्ये ५०० रुग्ण भरती आहेत. तर उर्वरित खासगी कोरोना रुग्णालयात दीड हजारावर रुग्णांवर पचार सुरू हेते.
लक्षणे नसलेले ११ हजार १०६ कोरोनाबाधित गृहविलगीकरणात आहेत. हेच रुग्ण जिल्ह्यासाठी धोकादायक ठरणार असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. पुर्वी केवळ सधन कोरोनाबाधित रुग्ण गृहविलगीकरणात असतं. उर्वरित सर्व रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये होते. मात्र कोविड केअर सेंटरची संकल्पना उध्वस्त झाली. प्रशासनाला यांच्या जेवणाची सोय करावी लागत असल्यानेच प्रशासन कोविड सेंटरमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांना ठेवत नसल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. हेच रुग्ण धोकादायक ठऱण्याची भिती व्यक्त होत आहे.
कोरोना शिरला मनोरुग्णालयात
गरज नसताना कोरोना आणिबाणीच्या काळात मनोरुग्णालयातील डॉक्टरांकडून दर दिवसाला मनोरुग्णाना रेफर करण्यात येते. अखेर मनोरुग्णालयात कोरोना शिरला, येथील ३५ वर्षीय मनोरुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. एखादा मनोरुग्ण कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यास मनोरुग्णालय नवे "हॉटस्पॉट' बनण्याची भिती मेडिकलमधील एका डॉक्टरने व्यक्त केली होती. नेमकी हीच स्थिती आज आली आहे. मागील तीन दिवसांत तीन मनोरुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.
आकडे बोलतात
तारीख | कोरोनाबाधित |
१३ सप्टेंबर २०२० | २,३४३ |
१३ मार्च २०२१ | २,२६१ |
११ मार्च २०२१ | १,९५७ |
१० मार्च २०२१ | १,९७९ |
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.