esakal | Nagpur । चुलत भावाच्या अत्याचारानंतर ‘ती’ झाली गर्भवती
sakal

बोलून बातमी शोधा

rape

चुलत भावाच्या अत्याचारानंतर ‘ती’ झाली गर्भवती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बाळापूर : ही माझी पत्नी असून, अद्याप आम्हाला बाळ नको...., असे एका अल्पवयीन मुलीला घेऊन आलेल्या २३ वर्षीय युवकाने जिल्हा स्त्री रूग्णालयातील डॉक्टरांना सांगितले. तेथील डॉक्टरांनी मुलगी अल्पवयीन असल्याचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली व त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

चुलत बहिणीलाच आपल्या वासनेची शिकार करणाऱ्या २३ वर्षीय युवकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. बाळापूर पोलिसांच्या हद्दीतील गोरेगाव खुर्द येथे बहिण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बाळापूर तालुक्यातील गोरेगाव खुर्द येथे एक महिला आपल्या अल्पवयीन मुलीसोबत राहत होती. या महिलेने आपला पुतण्याला कोणीच जवळचे नातेवाई नसल्याने घरात आश्रय दिला होता. सदर महिलेचा पती दारुड्या असल्याने ती एकटीच मोलमजुरी करुन चरितार्थ चालवत होती. ती मजुरीला बाहेर जात असल्याची संधी साधून या युवकाने

हेही वाचा: वन डे ट्रीप : ऐतिहासिक कनकेश्वर

लग्नाचे आमिष दाखवून आपल्याच चुलत बहिणीवर अत्याचार केला. यातूनच ती गर्भवती राहिली. त्यामुळे घाबरून युवकाने त्या पीडितेला अकोला येथे स्त्री रुग्णालयात गर्भपात करण्याच्या उद्देशाने घेऊन गेला. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने पती- पत्नी असल्याचा बनाव केला. डॉक्टरांना संशय आल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. बाळापूर पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या वाडेगाव पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक गजानन रहाटे यांनी तपास करून मंगळवार, ता. २८ रोजी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे.

"गोरेगाव खुर्द येथे नुकतीच ही घटना घडली उघडकीस आली आहे. आरोपीने नात्यातील अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. यातूनच ती गर्भवती राहिली. पोलिसांनी बारकाईने तपास करून ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक केली व त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे."-गजानन रहाटे, पोलिस उपनिरीक्षक, वाडेगाव पोलिस चौक

loading image
go to top