Bhandara : शिपायाने चोरले रिव्हॉल्व्हरसह काडतूस

नीलेश भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात मुद्देमाल व हिफाजत कक्षात कर्तव्यावर होता.
Revolver-police
Revolver-policesakal

भंडारा : कर्जबाजारीपणाला वैतागून एका पोलिस शिपायाने सावकाराला धाक दाखविण्यासाठी भंडारा न्यायालयाच्या पोलिस गार्ड रूममधून शनिवारी (ता. २९) चक्क रिव्हॉल्व्हर व ३५ काडतूस चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी आरोपी पोलिस शिपायास रविवारी (ता. ३०) रात्री अटक केली. नीलेश खडसे (रा. गणेशपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

नीलेश भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात मुद्देमाल व हिफाजत कक्षात कर्तव्यावर होता. घटनेच्या दिवशी शनिवारी आरोपी नीलेशची ड्यूटी नसताना तो गार्ड रूममध्ये बॅग घेऊन आला व पाच मिनिटे थांबून शस्त्रांची तपासणी करून बॅगसह निघून गेला. दरम्यान, सहायक फौजदार सुनील सायम यांच्या नावाने असलेली ०.३८ रिव्हॉल्व्हर आणि ९ एमएमचे ३५ काडतूस शनिवारी चोरून नेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com