
नागपूर : ऑपरेशन सिंदूर संघर्षादरम्यान अवघ्या जगाने भारताची क्षेपणास्त्र ताकद पाहिली. आता भारताची हीच ताकद आणखी मजबूत करण्यासाठी सैन्याच्या ताफ्यात ‘भार्गवास्त्र’ची एन्ट्री झाली आहे. नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे सत्यनारायण नुवाल यांच्या ‘सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड’ने (एसडीएएल) ‘भार्गवास्त्र’ डिझाईन आणि विकसित केले आहे.