esakal | १८ वर्षांची सून अन् दोन महिन्याचे बाळ, विचित्र प्रकरणामुळे भरोसा सेल संभ्रमात
sakal

बोलून बातमी शोधा

बालविवाह

१८ वर्षांची सून अन् दोन महिन्याचे बाळ, विचित्र प्रकरणामुळे भरोसा सेल संभ्रमात

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : माझी सून नेहमी माहेरी पळते...तिला दोन महिन्यांचे बाळ आहे...तिला आम्हाला नांदवायचे आहे..पण ती सासरी यायला तयार नाही... अन् माझा पोरगा बायकोशिवाय जगू शकत नाही.. आणि ती नांदायला तयार नाही...साहेब, आम्हाला न्याय द्या...अशी कैफीयत सासूने ‘भरोसा सेल’मध्ये (bharosa cell nagpur) केली. या तक्रारीवर कारवाई करताना महिला पोलिस अधिकारीही (nagpur police) संभ्रमात पडल्या आहेत. (bharosa cell confused due minor girl marriage case in nagpur)

हेही वाचा: नाना पटोले, नितीन राऊत यांचा वाद पोहोचला दिल्ली दरबारी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षाची रिया (बदललेले नाव) ही आईवडीलासह अंबाझरीत राहते. ती दहावीत असतानाच तिचे वस्तीत राहणारा १८ वर्षीय सुशांत याच्याशी ओळख झाली. सुशांतने शाळा सोडली आणि मिळेत ते काम करायला लागला. एका कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणून काम करीत होता. त्यामुळे त्याच्या हातात पैसा खेळत होता. दरम्यान रियासोबत त्याने मैत्री वाढवली. त्यानंतर त्याने रियाला प्रपोज केले. रियानेही त्याला लगेच होकार दिला. दोघांच्याही भेटी-गाठी वाढल्या. प्रेम आणि शारीरिक संबंध यातील अंतर न समजून घेता ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या हातात-हात घालून फिरायला लागले. वयाची जेमतेम १७ वर्षेही पूर्ण न झाले असताना दोघांनी लग्न करून सुखी संसार थाटण्याची स्वप्ने बघितली. १९ वर्षांच्या सुशांतने तिला लग्न करून आनंदी जीवन जगू, आपले घर असेल, तू आणि मी राजा राणीचा संसार असेल, असे स्वप्नरंजन केले. त्यावर रियासुद्धा भाळली. दोघांनीही आपापल्या घरी सांगून लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय घेतला. लग्नाचा विषय काढताच रियाच्या आईने तिला झाप-झाप झापले. परंतु, ती लग्नाच्या जिद्दीला पेटली होती. ‘आई माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे, त्याच्याशिवाय मी नाही जगू शकणार.’ असे सांगताच आईने तिला स्वतःच्या वयाचा विचार करण्यास सांगून गोष्ट टाळली. दुसरीकडे एकुलत्या असलेल्या १९ वर्षीय सुशांत तर ऐकायला तयारच नव्हता. दोघेही लग्न करण्यावर अडले तर आईवडीलही नकारघंटा वाजवत होते.

पळून जाऊन केले लग्न -

रिया आणि सुशांतला दोन्ही कुटुंबीयांकडून विरोध होत होता. त्यामुळे दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. वेळ आणि दिवस ठरला. रियाने घरातील कपड्याची बॅग भरली आणि रात्रीच मैत्रिणीकडे ठेवली. दुसऱ्या दिवशी सुशांत दुचाकी घेऊन आला. दोघेही पळून गेले आणि थेट मंदिरात पोहचले. काही मित्र-मैत्रिणींनी मंदिरात लग्न लावून दिले.

संसार सुरू-अडचणींचा डोंगर -

रियाला घेऊन सुशांत घरी आला. आईनेही आरडओरड केली आणि दोघांनीही घरात घेतले. संसार सुरू झाल्याच्या तीन महिन्यांतच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यातही सहा महिन्यांतच रियाने गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर मात्र बेरोजगार पती आणि अल्पवयात लादलेल्या मातृत्वामुळे संसारात समन्वय साधने कठिण झाले. तिने आईला फोन केला आणि बाळासह घरी गेली.

सासरी राहण्यास नकार -

रिया माहेरी गेल्यानंतर सुशांतने घरी तांडव सुरू केला. त्यामुळे त्याच्या आईने रियाच्या आईवडीलांशी चर्चा करून रियाला घरी पाठविण्याची विनंती केली. मात्र, रिया आठ दिवस राहिल्यानंतर पुन्हा माहेरी आली. पूर्वीप्रमाणे स्वातंत्र्य नसल्याने तिला सासरी राहायचे नाही. तर दुसरीकडे पती सुशांत आत्महत्या करण्याची धमकी देत आहे.

...तर बलात्कारचा गुन्हा -

१७ वर्षांची रिया आणि १९ वर्षांचा सुशांतने लग्न केल्यामुळे कायदेशिररित्या त्यांचे लग्नाचे वय नाही. त्यामुळे पोलिस ठाण्यात गेल्यास थेट सुशांतवर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात येईल. त्यामुळे प्रकरण ‘भरोसा सेल’कडे आले. आता तेथील महिला पोलिस अधिकारी संभ्रमात पडले आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार यामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे.

loading image