esakal | नाना पटोले, नितीन राऊत यांचा वाद पोहोचला दिल्ली दरबारी
sakal

बोलून बातमी शोधा

नाना पटोले, नितीन राऊत यांचा वाद पोहोचला दिल्ली दरबारी

नाना पटोले, नितीन राऊत यांचा वाद पोहोचला दिल्ली दरबारी

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांच्यातील वाद दिल्ली दरबारी पोहोचला आहे. प्रदेशाध्यक्षांची तक्रार करण्यासाठी राऊत दिल्लीला गेले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, दोन्ही नेत्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. (The-dispute-between-Nana-Patole-and-Nitin-Raut -reached-the-Delhi)

नाना पटोले यांनी खनिकर्म मंडळातील कोल वॉशरीच्या निविदेत गैरव्यवहाराचा आरोप करून अप्रत्यक्षपणे राऊत यांनाच टार्गेट केले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. उद्योगमंत्र्यांनी याची तातडीने विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याची घोषणाही केली आहे. विशेष म्हणजे खनिकर्म मंडळाच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे सहयोगी आमदार आशीष जयस्वाल आहेत. उद्योगमंत्र्यांच्याच अखत्यारीत हे मंडळ येते.

हेही वाचा: १२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या

नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हापासूनच ते ऊर्जामंत्री होणार, अशी चर्चा जोरात सुरू आहे. नागपूर लोकसभेची निवडणूक लढल्याने त्यांना नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा व्हायचे असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पटोले आणि राऊत यांच्यात मतभेद निर्माण झाले.

हेही वाचा: आमदार कृष्णा खोपडे यांच्या बहीण जवायाची आत्महत्या

नाना पटोले यांच्या नेतृत्वात गुरुवारी महागाई व इंधन दरवाढीच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनातही राऊत सहभागी झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर राऊत दिल्लीत गेल्याने या चर्चेला दिवसभर चांगलाच ऊत आला होता.

(The-dispute-between-Nana-Patole-and-Nitin-Raut -reached-the-Delhi)

loading image