Loksabha Election : लोकसभा निवडणुकीबाबत उदयनराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, श्रीनिवास पाटलांना आव्हान..

लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक (Loksabha Election) लढवण्याचा अधिकार आहे.
Udayanraje Bhosale LokSabha Election
Udayanraje Bhosale LokSabha Electionesakal
Summary

''श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) हे वयाने मोठे तर आहेतच. त्याचबरोबर ते वडीलधारे व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना आव्हान देण्याचे वक्तव्य मी करणार नाही.’’

नागपूर : लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक (Loksabha Election) लढवण्याचा अधिकार आहे. खरंतर निवडणूक लढवावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्याला मी काही अपवाद नाही. मोदीजींनी देशात विकास केला आहे. त्यामुळे मी भाजपकडूनच (BJP) लढणार आहे, असे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेची निवडणूक लढण्याचे संकेत दिले.

Udayanraje Bhosale LokSabha Election
हृदयविकाराचा धक्का येऊनही एसटी चालकाने वाचविले 31 प्रवाशांचे प्राण; पुणे-बंगळूर महामार्गावर थरार

दरम्यान, श्रीनिवास पाटील हे वडीलधारी असल्याने त्यांना आव्हान देण्याचे वक्तव्य मी करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज सकाळी नागपुरात शिवजयंती साजरी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शिवजयंतीनिमित्त देशभरातील नागरिकांना आणि शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार आहात का, या प्रश्नावर खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, “माझी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा तुम्हीच सर्वांनी सांगा, की तुमची काय इच्छा आहे. खरंतर निवडणूक लढवावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्याला मी काही अपवाद नाही.’’

Udayanraje Bhosale LokSabha Election
Maratha Reservation : मनोज जरांगेंना दिलेला 'तो' शब्द पाळावा; शाहू छत्रपती महाराजांचं सरकारला महत्त्वाचं आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) खासदार श्रीनिवास पाटली यांच्या विरोधात निवडणूक लढणे तुम्हाला आव्हान वाटते का, यावर उदयनराजे म्हणाले, ‘‘आपल्या देशात लोकशाही आहे आणि प्रत्येकाला या लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा, मतदान करण्याचा आणि आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) हे वयाने मोठे तर आहेतच. त्याचबरोबर ते वडीलधारे व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना आव्हान देण्याचे वक्तव्य मी करणार नाही.’’

मराठा आरक्षणाकडे सरकारचे दुर्लक्ष होतेय असे वाटते का, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, ‘‘त्या काळात मंडल आयोगाकडून चूक झाली. आरक्षण हे फक्त मागासवर्गाला न देता कुठल्याही जाती धर्मातील व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही त्यांना मदत करणे हा विचार हवा होता.’’ खरंतर प्रत्येकाला वाटतं आपल्यावर अन्याय होऊ नये. जसा मराठा समाज विचार करते, तसा इतर समाजसुद्धा विचार करत आहे, असेही ते म्हणाले.

Udayanraje Bhosale LokSabha Election
जयंत पाटील भाजपमध्ये जाणार? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, भाजपच्या वरिष्ठांबरोबर..

उदयनराजे म्हणाले

  • सर्वांच्या नसा नसात शिवाजी महाराज आहेत.

  • महाराजांचे जे विचार होते, त्याच विचारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशात काम करीत आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी यांनी सर्वसामान्यांपर्यंत विकास पोचवला आहे.

  • महाराष्ट्रात आणि देशभरात विकास पाहायला मिळत आहे.

  • त्यामुळे जनता भाजपशिवाय दुसरा विचार करणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com