Police inspecting the accident spot in Hinganya where two youths lost their lives.
sakal
नागपूर: वाढदिवस साजरा करून परत येत असलेल्या दोन तरुणांवर काळाने झडप घातली आणि वाढदिवसाचा आनंद औटघटकेचा ठरला. हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोंडा ते हिंगणा रोड आऊटर रिंग रोड पुलाजवळ पीकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (ता.२०) सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला.