
नागपूर : पंधरा दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या रोज बातम्या धडकत होत्या. मात्र गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीने यात अचानक ट्विस्ट आला. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही भावांना भाजपला एकत्र येऊ द्यायचे नसल्याचा आरोप केला आहे. दोन्ही भाऊ एकत्र आल्यास भाजपला परवडणार नाही. त्यामुळे त्यांना एकत्र येऊ द्यायचे नाही असे भाजपने ठरवल्याचे या भेटीगाठीवरून दिसते, असेही त्यांनी सांगितले.