esakal | ...ही तर राजकारणाची हद्दच! काँग्रेसचे लसीकरण केंद्र भाजपने पाडले बंद
sakal

बोलून बातमी शोधा

...ही तर राजकारणाची हद्दच! काँग्रेसचे लसीकरण केंद्र भाजपने पाडले बंद

...ही तर राजकारणाची हद्दच! काँग्रेसचे लसीकरण केंद्र भाजपने पाडले बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : निवडणूक जवळ आल्याने महापालिकेच्या कोरोना लसीकरण केंद्रावरूनही राजकारण (Politics from Vaccination Center in Nagpur) केले जात आहे. आतापर्यंत केंद्राची पळवापळवी केली जात होती. मात्र, पन्नासे ले-आऊट येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेले लसीकरण केंद्र भाजपच्या नगरसेवकांनी दबाव (BJP close Congress vaccination center)टाकून चक्क बंद पाडले. (BJP-close-Congress-vaccination-center-in-Nagpur)

पन्नासे ले-आऊट समाज भवन येथे १६ जूनला महापालिकेने लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली. ११ जुलैला प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरण केंद्राला चांगला प्रतिसाद लाभला. पहिल्याच दिवशी या केंद्रावर ३२० नागरिकांचे लसीकरण झाले. साठा मर्यादित असल्याने सुमारे दोनशे नागरिकांना परत जावे लागले. ही बाब परिसरातील भाजपच्या नगरसेवकांना खटकली. त्यांनी महापालिकेतील नेत्यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर दबाव आणला. त्यामुळे सुरू झालेले लसीकरण केंद्र बंद झाले.

हेही वाचा: प्रेयसीने दिली ‘गुड न्यूज’ अन् प्रियकराला खावी लागली तुरुंगाची हवा

पन्नासे ले-आऊटमधील लसीकरण केंद्र कुठल्याही राजकीय पक्षाचे नव्हते. नागरिकांच्या सोयीसाठी ते सुरू करण्यात आले होते. या परिसरातील नागरिकांचीही तशी मागणी होती. मात्र, आपले राजकीय महत्त्व कमी होत असल्याचा गैरसमज प्रभागातील भाजपच्या नगरसेविकेने केला. यातून केंद्र बंद पाडण्यात आले, अशी तक्रार वैभव काळे यांनी जिल्हाधिकारी तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्याकडे केली आहे. हे केंद्र पुन्हा सुरू करावे अशी मागणीही काळे यांनी केली आहे.

(BJP-close-Congress-vaccination-center-in-Nagpur)

loading image