esakal | प्रेयसीने दिली ‘गुड न्यूज’ अन् प्रियकराला खावी लागली तुरुंगाची हवा
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेयसीने दिली ‘गुड न्यूज’ अन् प्रियकराला खावी लागली तुरुंगाची हवा

प्रेयसीने दिली ‘गुड न्यूज’ अन् प्रियकराला खावी लागली तुरुंगाची हवा

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : मोहरम यात्रेत भेट झाल्यानंतर परवेज फिरोज खान आणि रिया (काल्पनिक नाव) यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. चार वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवल्यानंतर रिया गर्भवती झाली. नंतर मात्र, त्याच्या मनात वेगळेच शिजले. तसा तो मनातून हादरला होता. मग त्याने गर्भपात केल्यास विवाहाचे (boyfriend arrested) वचन दिले. बळजबरीने गर्भपात करण्यास बाध्य केल्यानंतर परवेजने (Atrocities on girl) वचनभंग केल्याने रियाने पोलिसात तक्रार दिली. हा प्रेमवीर आता तुरूंगाची हवा खात आहे. (refused-to-get-married-after-being-abused-by-boyfriend-in-Nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय युवती ही इमामवाड्यात आई-वडिलांसह राहते. सप्टेबर २०१७ मध्ये मोहरमच्या यात्रेत परवेज खान (रा. मोमीनपुरा, डोबी एरिया) याच्याशी तिची ओळख झाली. परवेज हा खासगी ॲम्ब्युलन्सचा चालक आहे. त्याने रियाचा मोबाईल क्रमांक घेतला आणि चॅटिंग करायला लागला. दोघांनीही चॅटिंग सुरू केली. दोघांनी एकमेकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांची घट्ट मैत्री झाली. दोघांच्या भेटी-गाठी होत राहिल्या.

हेही वाचा: नागपूरच्या भावेशची ‘इंडिया बुक’मध्ये नोंद; चतुष्कोन पूर्ण

त्याने २०१८ मध्ये रियाला ‘लॉंग ड्राईव्ह’ला नेले. तेथून त्याने थेट सदरमधील मंगळवारी कॉम्पलेक्समध्ये राहणाऱ्या स्टेला आंटी हिच्या घरी नेले. घरात कुणीही नसल्याची संधी साधून त्याने शारीरिक संबंधाची मागणी केली. रियाने नकार देताच परवेजने बलात्कार केला. १० दिवसांनंतर तो इमामवाड्यात आला आणि रियाला बळजबरीने दुचाकीवर बसायला लावून घेऊन गेला. त्याने जंगलात नेऊन बलात्कार केला. यानंतर परवेज वारंवार रियाशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लागला.

परवेज खान हा रियाच्या घरी जाऊनसुद्धा बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. फेब्रुवारी २०२१ ला रिया गर्भवती झाली. तिने परवेजला फोन करून ‘गुड न्यूज’ दिली. परवेज लगेच तिच्या घरी आला. त्याने तिची इच्छा नसताना गर्भपात करण्यास सांगितले. तिने नकार दिला असता गर्भपात केल्यानंतर लगेच लग्न करण्याचे आमिष दाखवले.

हेही वाचा: चंद्रपूर : गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

लग्नास केली टाळाटाळ

मार्च महिन्यापासून तो तिला लग्नाचे आमिष दाखवत होता. तिने लग्न करण्याबाबत तगादा लावला असता टाळाटाळ करू लागला. त्यानंतरही तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरूच होता. परवेजने नातेवाईक मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेत रियाला लग्नास नकार दिला. त्यामुळे रियाने सदर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून परवेजला अटक केली.

(refused-to-get-married-after-being-abused-by-boyfriend-in-Nagpur)

loading image