नागपुरात भाजपला दे धक्का! ज्येष्ठ नगरसेवकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Bhoyar

नागपुरात भाजपला दे धक्का! ज्येष्ठ नगरसेवकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : सध्या विधानपरिषद निवडणुकांसाठी (legislative council election) वातावरण तापलं असून भाजपने चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांना उमेदवारी दिली आहे. पण, निवडणुकीच्या काळातच काँग्रेसने (congress) भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांना विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा: परमबीर सिंह भारतातच, ४८ तासांत CBI समोर होणार हजर

डॉ. भोयर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आहे. ते नासुप्रचे विश्वस्त होते. भाजपने त्यांना उपमहापौरपदही दिले होते. त्यांनी वर्धा येथे झालेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरा दरम्यान काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याचीही चर्चा होती. तसेच भाजपमध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे त्यांचे म्हणणे होते. अखेर आज त्यांनी डॉ. रवींद्र भोयर यांनी आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसकडून मिळणार उमेदवारी? -

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार घोषित करण्याची काँग्रेसची परंपरा आहे. काँग्रेसने उमेदवारी घोषित केल्यानंतर अनेकांना धक्का बसतो. तसाच धक्का आता विधानपरिषद निवडणुकीत देखील बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐन अर्ज भरण्याच्या कालावधीत भाजपकडून आलेल्या व्यक्तीला काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता आहे. बावनकुळेंना तगडे आव्हान देण्यासाठी काँग्रेस ही रणनिती आखणार असल्याची चर्चा आहे.

loading image
go to top