Nagpur News : रामभक्तांना ‘हरामखोर’ म्हणणाऱ्यांना ‘रामरक्षा’ आठवली! निमंत्रणावरून संजय राऊतांवर संदीप जोशींचा घणाघात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार संजय राऊत यांनी पाठविलेल्या रामरक्षा पठणाच्या निमंत्रणावर भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी जोरदार पलटवार केला.
sanjay raut and bjp former mla sandeep joshi

sanjay raut and bjp former mla sandeep joshi

sakal

Updated on

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार संजय राऊत यांनी पाठविलेल्या रामरक्षा पठणाच्या निमंत्रणावर भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी जोरदार पलटवार केला आहे. खुले पत्र प्रसिद्ध करत त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिंदुत्त्व शिकविण्याचा प्रयत्न म्हणजे निव्वळ राजकीय विनोद असून, हा केविलवाणा राजकीय स्टंट आहे. रामभक्तांना 'हरामखोर' म्हणणाऱ्यांना आता 'रामरक्षा' आठवली, असाही टोला त्यांनी लगावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com