Nagpur News : माजी आमदारावर गंभीर आरोप करत भाजपच्या महिला नेत्याच्या पतीची रेल्वेखाली आत्महत्या BJP leader's husband commits suicide under train; Serious allegations against former BJP MLA in suicide note | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Avinash Manatkar

Nagpur News : माजी आमदारावर गंभीर आरोप करत भाजपच्या महिला नेत्याच्या पतीची रेल्वेखाली आत्महत्या

नागपुरातील भाजप नेत्या नयनाताई मनतकर यांचे पती अविनाश मनतकर यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमधील अजनी भागामध्ये ही घटना घडली आहे.

आत्महत्या केलेल्या मनतकर यांच्याजवळ सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये मनतकर यांनी आत्महत्येला भाजपचेच माजी आमदार चैनसुख संचेती यांना जबाबदार असल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अविनाश मनतकर यांनी गुरुवारी दुपारी अजनी भागात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्याजवळ एक सुसाईड नोट मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी बुलढाण्याचे भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संचेती यांच्यामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचे मनतकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मनतकर यांनी गुरुवारी दुपारी अजनी रेल्वे स्थानकावर फ्लॅट फॉर्मक्रमांक एकवर धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. अविनाश मनतकर यांच्या पत्नी नयनाताई मनतकर या भाजपच्या प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा आहेत. मनतकर हे तेल्हारा वांगेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक होते.

संचेती अध्यक्ष असलेल्या मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारात अध्यक्ष संचेती आणि उपाध्यक्ष लखाणी यांनी फसवल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. या सुसाईड नोटमध्ये रामदास पेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी किशोर शेळके यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आला आहे.

टॅग्स :BjpNashik