

Tukaram Mundhe Faces Dismissal Demand by BJP MLA Over Frequent Transfers Fadnavis Says Will Review
Esakal
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना बडतर्फ करावे अशी मागणी नागपूर पूर्वमधून भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभेत केली. तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीचा अधिकार नसताना नियमबाह्य काम केल्याचा आरोप आमदार खोपडे यांनी केला. तसंच महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींना धमकी देणं हा विशेषाधिकाराचा भंग आहे आणि तुकाराम मुंढेंबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल असं सांगितलं.