भाजप आमदार करणार तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी, नियमबाह्य काम केल्याचा आरोप

प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार हिवाळी अधिवेशनात करणार असल्याची माहिती समोर येत आहे. नागपूर महापालिका आयुक्त असताना त्यांनी नियमबाह्य काम केल्याचा आरोप केला आहे.
BJP MLAs Demand Suspension of Tukaram Mundhe

BJP MLAs Demand Suspension of Tukaram Mundhe

Esakal

Updated on

राज्याचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनात भाजप आमदारांकडून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विशेष लक्षवेधी सूचना मांडून ही मागणी करण्यात येणार आहे. तुकाराम मुंडे हे नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना त्यांना नियमबाह्य पद्धतीने कारभार केल्याचा आरोप भाजप आमदारांचा आहे. यामुळे तुकाराम मुंढे यांचं निलंबन करावी अशी मागणी भाजप आमदार विधीमंडळ अधिवेशनात करणार असल्याचं समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com