J. P. Nadda : विकासात्मक धोरणाला महत्त्व ,जे. पी. नड्डा ; भाजप राष्ट्रीय अध्यक्षांची गोंदिया येथे सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात महिलांना न्याय मिळत असून, गरिबांना विकासाच्या धोरणात आणले जात आहे. २५ कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले. ८० कोटी जनतेला ५ किलो रेशन आमचे सरकार नि:शुल्क देत आहे.
J. P. Nadda
J. P. Nadda sakal

गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात महिलांना न्याय मिळत असून, गरिबांना विकासाच्या धोरणात आणले जात आहे. २५ कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले. ८० कोटी जनतेला ५ किलो रेशन आमचे सरकार नि:शुल्क देत आहे. विकासात्मक धोरणाला सरकार महत्त्व देत आहे. असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले.

भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे व गडचिरोली-चिमूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचाराकरिता येथील सर्कस मैदानात सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

ही निवडणूक म्हणे दोन विचारधारेच्या विरोधातील लढाई आहे. विरोधकांजवळ भारताच्या विकासाचे कोणतेही व्हीजन नाही. केवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा विरोध करणे एव्हढाच त्यांचा अजेंडा आहे.

J. P. Nadda
Loksabha Election 2024 : न्यायाची हमी देणारा दस्तावेज ; काँग्रेसने मांडले ‘नवसंकल्प आर्थिक धोरण’

भ्रष्टाचार हटवण्याकरिता आम्ही लढतोय, तर इंडिया आघाडी भ्रष्टाचारी लोकांना वाचविण्याची धडपड करीत आहे. अर्धे भ्रष्टाचारी जेलमध्ये गेले तर अर्धे बेलवर बाहेर आहेत, असे नड्डा यावेळी म्हणाले. जातीगत जनगणनेच्या विरोधात भाजप व महायुती नाही. परंतु काँग्रेस जातीगत जनगणनेच्या नावावर जातीय राजकारण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com