Legislative Council Elections : नागपूरकर अनुभवणार भाजपविरुद्ध ‘स्वयंसेवक’ अशी लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Bhoyar and
Chandrashekhar Bawankule

नागपूरकर अनुभवणार भाजपविरुद्ध ‘स्वयंसेवक’ अशी लढत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर डॉ. रवींद्र उपाख्य छोटू भोयर यांनी सोमवारी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मंगळवारी ते विधान परिषदेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ते आव्हान देणार आहे.

स्मृती मंदिर असलेल्या रेशिमबागेतून डॉ. रवींद्र उपाख्य छोटू भोयर चारवेळा भाजपचे नगरसेवक होते. त्यांचे वडील डॉ. प्रभाकर भोयर संघाच्या ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्पमध्ये वैद्यकीय सेवा देत होते. त्यामुळे डॉ. भोयर हे संघाच्याच मुशीत वाढले. आजही त्यांनी कॉंग्रेसच्या व्यासपीठावरून संघाच्याच शिकवणीचा हवाला दिला. त्याचवेळी चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा परिषदेपासून भाजपमध्ये आहे. आमदार, मंत्री अशी पदेही त्यांनी भूषविली. त्यामुळे भाजप नेत्याविरुद्ध ‘स्वयंसेवक’ अशी लढत प्रथमच नागपूरकर अनुभवणार आहे.

हेही वाचा: सेक्समुळे स्पेनचा समुद्रकिनारा झाला उद्ध्वस्त; आढळले २९८ स्पॉट

विधान परिषद नागपूर मतदारसंघासाठी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. आकाशवाणी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीतून भाजपने शक्तीप्रदर्शनच केले. संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर बावनकुळे आकाशवाणी चौकात आले. येथे मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यामुळे आकाशवाणी चौक भाजपच्या झेंड्यांनी भरलेल्या दिसून आला.

कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे आकाशवाणी चौक ते संविधान चौकापर्यंतची वाहतूक वळविण्यात आली होती. केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शहर भाजपाध्यक्ष आमदार प्रवीण दटके, बरिएमंच्या ॲड. सुलेखा कुंभारे, खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, समीर मेघे, गिरीश व्यास, मोहन मते, महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार सुधाकर देशमुख, प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, डॉ. मिलिंद माने, चरणसिंग ठाकूर, डॉ. राजीव पोतदार, मनपातील सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, ॲड. धर्मपाल मेश्राम, यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य, नगर पालिकांचे नगरसेवक, पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: दारूसोबत चकणा म्हणून या पदार्थांचे तर सेवन करत नाही ना?

येथून बावनकुळेंसह केंद्रीयमंत्री गडकरी, विरोधी पक्षनेते फडणवीस जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी विमला आर. यांच्याकडे अर्ज सादर केला. यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी व बरिएमंच्या ॲड. सुलेखा कुंभारे उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी बावनकुळे यांचे गडकरी यांच्या घरी कांचन गडकरी यांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. यावेळी बावनकुळे यांचे कुटुंब उपस्थित होते.

भाजप मतदार जाणार टूरवर

विधानपरिषद निवडणुकीत मतदार फुटणार नाही, यासाठी भाजपने सावध पवित्रा उचलला आहे. भाजपच्या मतदारांना बाहेर टूरवर पाठविण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले. विशेष म्हणजे भाजपचे मतदार असूनही तळ्यात मळ्यात भूमिका असलेल्या सदस्यांना पहिल्याच टप्प्यात अज्ञातस्थळी पाठविण्यात येणार असल्याचे समजते.

loading image
go to top