

Crime Branch officials with the accused arrested in India–New Zealand T20 match ticket black marketing case.
Sakal
नागपूर: भारत-न्यूझीलंड टी-२० क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला गुन्हेशाखा युनिट- ५ च्या पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपीकडून तिकिटे व मोबाईलसह २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोहम्मद आदीब शेख ईजाज (वय १९, रा. ताजनगर, टेका नाका) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.