esakal | युवतींनो सावधान! प्रियकरावर आंधळा विश्वास ठेवू नका; ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

युवतींनो सावधान! प्रियकरावर आंधळा विश्वास ठेवू नका

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : प्रेमात पडल्यानंतर जगातील सर्वांत जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे प्रियकर आहे, असा अनेक तरुणींचा समज होतो. त्यामुळेच त्याच्याकडे गुपीतापासून ते खासगी फोटोपर्यंत तरुणी शेअर करतात. परंतु, प्रेमप्रकरणात काहीतरी बिनसले की त्याचा खरा चेहरा उघडकीस येतो. चक्क अश्‍लील वेबसाइटवर मोबाईल नंबर टाकण्यापासून ते खासगी फोटो व्हायरल करण्यापर्यंत मजल जाते वा ब्लॅकमेलिंग केले जाते. असे अनेक प्रकार नागपुरात उघडकीस आले आहेत.

स्मार्टफोन आणि स्वस्त असलेल्या इंटरनेटमुळे युवा पिढीचा सोशल मीडियावर चांगलाच वावर वाढला आहे. तरुण-तरुणींसाठी इंस्टाग्राम तर प्रेमाची देवाण-घेवाण करण्याचे साधन बनले आहे. सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर सुरवातीला ‘हाय-हॅलो’ पासून मैत्रीला सुरुवात होते. काही दिवस चॅटिंग केल्यानंतर दोघेही एकमेकांचे नंबर देतात. तेथूनच प्रेम कहाणीला सुरवात होते. एकमेकांशी मध्यरात्रीनंतर चॅटिंग करणे आणि प्रेमाच्या आणाभाका घेण्यापर्यंत सर्व काही सुरू असते. एकमेकांच्या भेटी आणि शारीरिक संबंधापर्यंत मजल जाते. तोपर्यंत युवक लग्नाचे आमिष देऊन मोकळा होता. त्याच्या बोलण्यावर आंधळा विश्‍वास ठेवून ती त्याला सर्वस्व अर्पण करते.

हेही वाचा: विषप्राशन करणाऱ्या महिलेला रुग्णालयात नेत असताना युवकाचा मृत्यू

खरा चेहरा होतो उघड

प्रेयसीच्या जीवनात आणखी कुणी आले किंवा तिचे लग्न ठरले की त्याचा खरा चेहरा उघडकीस येतो. तो लगेच तिला ब्लॅकमेलिंग करतो. तिला पैशाची मागणी करतो किंवा तिचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करतो. तिचे बनावट इंस्टा किंवा फेसबुकचे बनावट अकाऊंट तयार करून बदनामी केली जाते, असे अनेक प्रकार समोर आले आहे.

बदला घेण्यासाठी फोटो व्हायरल

मानकापुरात राहणाऱ्या एका युवतीचे जुने फोटो वापरून कोणीतरी बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. त्यावर स्वतः अज्ञात राहून त्या तरुणीचे अश्‍लील फोटो आणि मॅसेज पोस्ट करून तिची बदनामी सुरू केली. याप्रकरणी सायबर पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी तंत्रज्ञानाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. यातील आरोपी हा तिचा जुना प्रियकर सचिन यादव आसल्याचे समोर आले. याबाबत मानकापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपी सचिनने आपल्या कृत्याची कबुली देत, 'ब्रेक अप झाल्यानंतर प्रेयसीचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे' सांगितले. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याला अटक करण्यात आली असून सध्या तो पोलीस कस्टडीत आहे.

हेही वाचा: Video : बस पुरात वाहून गेली; चौघे बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

सोशल मीडियावर अनोळखी आणि विदेशी नंबरवरून बोलणाऱ्यांपासून सावध रहायला हवे. समोरच्या व्यक्तीला बोललेले वाक्य आणि दिलेले फोटो-व्हिडिओ भविष्यात सार्वजनिक झाल्यावर काय संदेश जाईल याचा विचार करून मर्यादा पालन केले पाहिजे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरील फोटो आणि अन्य महत्त्वाच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी ते सुरक्षित करून घ्यावे.
- केशव वाघ, स.पो.नि. सायबर क्राईम, नागपूर
loading image
go to top