ravindra katolkar
sakal
नागपूर - बनावट शालार्थ आयडी प्रकरणी सायबर पोलिसांनी आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला मंगळवारी (ता. २३) सकाळी वर्धा येथून अटक केली. यवतमाळ येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र शंकरराव काटोलकर (रा. गोविंदनगर, नागलवाडी, वर्धा) असे आरोपीचे नाव आहे. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदभार असताना, ३९ बनावट शालार्थ आयडी त्यांनी तयार केले होते.