
नागपूर : बोगस शिक्षक भरती व शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी उपसंचालक उल्हास नरड, लिपिक संजय दुधाळकर आणि माध्यमिक शिक्षण विभागाचा अधीक्षक नीलेश मेश्राम यांच्यावर १५ दिवसानंतर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसे पत्र शिक्षण विभागाने काढले असून सहाय्यक संचालक दीपेंद्र लोखंडे यांच्याकडे उपसंचालक कार्यालयाचा प्रभार देण्यात आलेला आहे.