esakal | साहेबऽऽ बॉम्ब बनविणाऱ्यांवर कारवाई करा; राहुलला १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

साहेबऽऽ बॉम्ब बनविणाऱ्यांवर कारवाई करा; १५ जूनपर्यंत कोठडी

साहेबऽऽ बॉम्ब बनविणाऱ्यांवर कारवाई करा; १५ जूनपर्यंत कोठडी

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : बॉम्ब (Bomb) बनविण्यासाठी राहुल पगाडे (राहुल पगडे यांनी बॉम्ब तयार केला) याने इंटरनेट आणि यु-ट्यूबवरून प्रशिक्षण (Training taken from internet and youtube) घेतल्यानंतर फोनवरून अजून कुणा-कुणाची मदत घेतली? तसेच तो यादरम्यान कुणाच्या संपर्कात होता, याचा शोध पोलिस घेत आहेत. त्यासाठी पोलिस राहुलच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढणार आहेत. न्यायालयाने आरोपीला १५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत (Police custody till June 15) ठेवण्याचे आदेश दिले. (Bomb-creator-Rahul-in-police-custody-till-June-15)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल युवराज पगाडे (२५, रा. साईबाबानगर) हा सलूनवर कारागीर म्हणून काम करीत होता. लॉकडाउनमुळे त्याच्या हातचे काम गेल्यानंतर स्मार्टफोनवर यु-ट्यूबवरून बॉम्ब कसा बनवावा याचे प्रशिक्षण घेतले. तीन आठवड्यांपूर्वी त्याने बॉम्ब तर बनवला, परंतु तो डिफ्युज कसा करावा, याबाबत माहिती नसल्यामुळे तो घाबरला. त्याने एका बॅगमध्ये बॉम्ब ठेवला आणि पाठीवर बॅग लटकवून नंदनवन पोलिस ठाण्यात आला. त्यामुळे पोलिस ठाण्यात मोठी खळबळ उडाली. बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करून बॉम्ब निकामी करण्यात आला. त्याने बॉम्ब स्वतःच तयार केल्याची कबुली दिली.

हेही वाचा: ‘आई, मी तुझी सेवा करायला येत आहे!’ मुलाने केली आत्महत्या

एखाद्या सजग नागरिकाप्रमाणे राहुल पगाडे पोलिस ठाण्यात आला. त्याने बॅग सापडल्याचे सांगून बॅग उघडायला लावली. त्यानंतर धक्का बसल्याचा आव आणत होता. ‘बॉम्ब बनविणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करायला हवी. अशा लोकांना पोलिसांनी शोधून काढले पाहिजे’ असा पोलिसांना सांगू लागला.

व्हायचे होते फेमस

राहुल पगाडे हा पूर्वी ‘टिकटॉक’चे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत होता. त्या व्हिडिओतून त्याला फेमस व्हायचे होते. त्यामुळे असे काहीतरी ‘शॉकिंग’ करून फेमस व्हावे, त्यामुळेच त्याला बॉम्ब बनविण्याची कल्पना सूचली. त्याने चक्क बॉम्ब बनविला आणि थेट पोलिस ठाण्यात गेला.

(Bomb-creator-Rahul-in-police-custody-till-June-15)

loading image