esakal | 'वक्त्यांची फॅक्टरी' कोमात, डिजिटल जोमात

बोलून बातमी शोधा

break to the elocution competition due to digital

चर्चासत्र, व्याख्यान, कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून आजची नवी पिढी वत्कृत्त्वाचे धडे गिरवते. विविध ठिकाणी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ही पिढी ज्येष्ठांचे विचार आत्मसात करतात.

'वक्त्यांची फॅक्टरी' कोमात, डिजिटल जोमात
sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : कुठलीही बाब जनमानसापर्यंत अचूक आणि मुद्देसूद पोहोचविण्यासाठी वक्त्याशिवाय पर्याय नाही. वाचन, श्रवण अशा विविध माध्यमातून वक्ते प्रशिक्षित होतात. यामध्ये, नव्या पिढीला वक्ता म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा फार मोलाचे काम करते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये या स्पर्धांचे आयोजन काहीसे थांबले आहे. वक्ते घडविणारी 'फॅक्टरीच लॉक' झाल्याने याचा फटका नव्या पिढीला बसतो आहे. 

हेही वाचा - ‘राज्य सरकारने दोन दिवसांचे म्हणत सात दिवसांचे लॅाकडाउन लादून फसवणूक केली’

चर्चासत्र, व्याख्यान, कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून आजची नवी पिढी वत्कृत्त्वाचे धडे गिरवते. विविध ठिकाणी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ही पिढी ज्येष्ठांचे विचार आत्मसात करतात. यातून अनेक मोठे वक्ते घडले असून विविध महत्त्वाचे पद देखील त्यांनी भूषविले आहे. अशातच, करमणुकीसाठी डिजिटल माध्यमे वाढल्याने नव्या पिढीचे वत्कृत्व कला आत्मसात करण्याचे माध्यम देखील बदलले आहे. मात्र, यामुळे परिपूर्ण वक्ते घडण्याला खीळ बसल्याचे मत जाणकार व्यक्त करतात. 

पूर्वी चर्चेसाठी माध्यम नसायची. विविध मुद्यांविषयी नागरिकांमध्ये कुतूहल असायचे. आता डिजीटलायझेशनमुळे घर बसल्या लोकांच्या शंकांचे निरसन होत आहे. यामुळे, वक्त्यांना स्पर्धांमध्ये सादरीकरण करायला प्रोत्साहन मिळणे कमी झाले. तसेच, अशा स्पर्धांचा खर्च उचलायला देणगीदारसुद्धा पुढे येत नाही. महाविद्यालय स्तरावर वत्कृत्व स्पर्धांचे आयोजन करून युवकांना प्रोत्साहन द्यायला हवे. 
-अंबादास मोहिते, ज्येष्ठ वक्ते 

हेही वाचा - आजारी वृद्धेस रस्त्यात टाकून आप्तांचे पलायन; प्रकृती...

उत्तम वक्ता होण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्याने प्रथम उत्तम श्रोता झाले पाहिजे. प्रत्येकाने व्याख्याने, भाषण ऐकली पाहिजेत. परंतु, वक्तृत्व स्पर्धा बंद असल्याने उत्तम वक्ते आपण गमावत चाललो आहोत. डिजीटलचे प्रमाण वाढले असून अशा कलांचा पुरेपुर उपयोग या माध्यमांनी करून घेतला आहे. लाईक आणि सबस्क्राईबच्या स्पर्धेत अशा कलेचे बाजारीकरण होणे, ही शोकांतिका आहे. यामुळे, वत्कृत्व कला बाजूला सारल्या जात आहे. 
-विशाखा गणोरकर, युवा वक्त्या