
Nagpur Land Fraud
sakal
नागपूर : जमिनीच्या बदल्यात तीन बीएचके फ्लॅट देण्याची बतावणी करून तो न देता, जमिनीची माहिती मिळविण्यासाठी एका बिल्डरने चक्क माजी पोलिस आयुक्त अंकुश धनविजय यांची बनावट स्वाक्षरी, ई-मेलआयडी आणि जुन्या आधारकार्डचा वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी बिल्डरविरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.