
नागपूर : बांधकाम प्रकल्पात पैसे गुंतवून अधिक फायदा देण्याचे आमिष दाखवित बिल्डर आशुतोष नाईक यांच्या कुटुंबीयांनी तीन कोटी ५ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी प्रेम प्रकाश भोयर (वय २४, रा. अभिनव काॅलनी, राजीननगर, वर्धा रोड) यांच्या तक्रारीवरून मायलेकावर बजाजनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.