सकारात्मक पाऊन टाकले अन् जन्माला आली रेडी टू इट ‘देशी रोटी’

सकारात्मक पाऊन टाकले अन् जन्माला आली रेडी टू इट ‘देशी रोटी’

नागपूर : कोरोनाच्या टाळेबंदीत अनेकांचे रोजगार गेले, पगार कमी झालेत. सकारात्मकता धुळीस मिळाली होती. दिशा नव्हती. कन्सलटन्सी आणि ऑनलाइन परीक्षा केंद्र बंद होते. त्यामुळे आर्थिक चणचण जाणवत होती. राखीव निधीतून कर्मचाऱ्यांना पगार दिले, न खचता आणि सकारात्मक विचारातून पाऊल टाकले. जिद्दीच्या जोरावर टाळेबंदीत संशोधन केले. रेडी टू ईटच्या धर्तीवर ‘देशी रोटी’ व्यवसायात येण्याचा संकल्प केला. त्यातूनच ‘देशी रोटी’ ही संकल्पना जन्माला आली, असे सांगतायेत विजय सोमकुंवर.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात अनपेक्षित आलेल्या अडचणीने सर्वच क्षेत्र डबघाईस आले. मात्र, किराणा व्यवसाय, भाजीपाला विक्री, खाद्य पदार्थ आणि औषध व्यवसायालाच फक्त सुगीचे दिवस होते. नोकरी गेलेल्या अथवा हातचे काम गेलेल्यांनी चरितार्थ चालविण्यासाठी या व्यवसायाला प्राधान्य दिले. मित्र परिवारातील एका परिवाराकडे असणाऱ्या गुणांचे व्यावसायीकरण करण्याचा विचार त्यांच्या मनात आणला. ती कल्पना विस्तारण्यासाठी त्याची लाइफ वाढविणे व पांरपारिक पद्धतीने कसे बळ देता येईल, यावर संशोधन केले.

सकारात्मक पाऊन टाकले अन् जन्माला आली रेडी टू इट ‘देशी रोटी’
घासलेटच्या दिव्याखाली अभ्यास करून पोहोचला प्राचार्य पदावर

व्यवसायाची व्यापकता लक्षात घेता त्याला मूर्त रूप दिले. पत्नी प्रज्ञा सोमकुंवर यांचा या स्टार्टअपमध्ये मोलाचा वाटा आहे. त्यांच्या हातच्या जेवणाला एक वेगळीच चव आहे. त्यातूनच हा व्यवसाय फुलणार होता. आता ते महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात याचे जाळे विणणार आहे. त्यासाठी तांत्रिक बळ देण्याचा विचार होता. जवळचे नातेवाईक अश्विन देवगडे व पत्नी प्रणाली यांचीसुद्धा साथ मिळाली.

देवगडे पुण्याला प्राध्यापक होते. त्यांनाही टाळेबंदीचा फटका बसला. प्रणाली देवगडे अडचणीत सापडले. त्यांना सोमकुंवर यांनी आधार दिला आणि नव्या व्यवसायाची कल्पना दिली. त्यांनीही आता नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करण्याचा निश्चय केला. नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे होणार, असा चंग बांधला. पारंपरिक खाद्याच्या व्यवसायात उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांच्या सकारात्मक विचाराला कर्तृत्वाची जोड मिळाली. आणि ‘देशी रोटी’ ही नवीन कल्पना पुढे आली. त्यातून हा व्यवसाय सुरू झाला आणि तो भरभराटीस आला. आता स्विगी, झोमॅटोवरसुद्धा हे खाद्य मागविता येणार आहे.

सध्या वाढती व्यस्तता आणि पत्नी-पत्नी दोघे नोकरी करीत असल्याने दररोज पारंपरिक खाद्य पदार्थ तयार करण्याच्या त्रासाला थोडी विश्रांती मिळणार आहे. त्यामुळे घरी आल्यानंतर लगेच त्याला गरम करताच घरी केलेल्या भाकरी अथवा पोळीचा आस्वाद घेता येणार आहे. हे खाद्य पौष्टिक आहे. मधुमेह आणि आजारी व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयोगी ठरणार असल्याचेही सोमकुंवर यांचे म्हणणे आहे.

सकारात्मक पाऊन टाकले अन् जन्माला आली रेडी टू इट ‘देशी रोटी’
‘ग्रीन टी’चा अतिरेक टाळा; याकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

विजय सोमकुवर यांचे वडील कृष्णराव भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरीला होते. तीन भाऊ आणि विजय यांचे बलापण मध्यमवर्गीय कुटुंबात गेले. त्यांना कधीही आर्थिक झळ बसली नव्हती. शिक्षणही चांगले सुरू होते. हुशार विद्यार्थी म्हणून ते ओळखले जात. पण, नियतीला ते मान्य नव्हते. १९८९ मध्ये वडिलांची तब्येत बिघडली. वडिलांच्या औषधोपचारावर खर्च होऊ लागला. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट होत गेली. शिक्षणासाठी पैसे मिळणे अवघड झाले. बी.कॉमपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर सीएच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. सीएचे इंटर उत्तीर्ण केले. तेव्हा एका सनदी लेखापालाकडे प्रशिक्षणार्थी म्हणून कामाला सुरुवात केली.

१९९५ साली वडिलांचे निधन झाले. परिवारावर तो मोठा आघात होता. चार भावंड आणि आई या पाच जणांचा चरितार्थ चालविणे कठीण झाले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील शिक्षणासाठी नोकरीशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे ज्या सनदी लेखापालाकडे प्रशिक्षण सुरू होते, तिथेच नोकरी स्वीकारली. तेव्हा नागपूरच्या मोठ्या आघाडीच्या खाद्य क्षेत्रातील कंपनीच्या व्यवहारातील त्रृटी काढली. त्यामुळे कंपनीच्या संचालकांनी कामाचे कौतुक केले आणि नोकरीची ऑफरही दिली.

सनदी लेखापालाकडील नोकरी सोडली आणि खाद्य कंपनीतील अकाउटंटच्या कामाचा श्रीगणेशा केला. लायझनिंग, अकाउटिंग, अर्थपुरवठा, प्रकल्प अहवाल आणि शासकीय अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून देण्याच्या कामापर्यंतची कामे केली. या सर्वच कामांमुळे दिल्ली आणि मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दृढ संबंध निर्माण झाले. त्यांनाही प्रकल्प अहवाल तयार करून देणे, युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अनुदान प्राप्त करण्यासाठी सल्लागारांची गरज होती. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी देशातील विविध खाद्य प्रक्रिया उद्योगांच्या लायझनिंगचे काम करण्यात संधी असल्याचे सुचविले. त्यातून विजय सोमकुंवर यांनाही संधी दिसू लागली होती.

सकारात्मक पाऊन टाकले अन् जन्माला आली रेडी टू इट ‘देशी रोटी’
चेहऱ्याचे सौंदर्य वाढवायचे? करा या घरगुती उपायांचा वापर

व्यवसायात संधी

युवकांनी व्यवसायात येताना घाबरण्याची गरज नाही. संधी खूप आहेत, फक्त ती शोधावी लागणार आहे. एस.सी आणि एस.टी. नवउद्योजकांना विनातारण कर्ज मिळण्याची सुविधा केंद्र सरकारने केली आहे. तेही काहीही गहाण न ठेवता. या संधीचा लाभ घेऊन युवकांनी व्यवसाय उतरावे, असा हितोपदेश विजय सोमकुंवर देतात. टाळेबंदीमुळे रोजगार गेल्यामुळे पुढे काय, असा प्रश्न अनेकांना पडला. त्यातून अनेकांनी संधी शोधून मार्गही काढले. युवकांनो आताही ‘रेडी टू ईट’ खाद्य पदार्थ आणि औषधी व्यवसायात संधी असल्याचे ते सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com