एनपीएस रद्द करा, जुनी पेन्शन लागू करा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शिक्षक भारतीचे काळ्या फीत लावून आंदोलन
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनsakal

नागपूर : राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने राज्य उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र झाडे यांच्या नेतृत्वात काळ्या फीत लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवासी जिल्हाधिकारी विजया बनकर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

राज्यातील कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २००५ पासून अंशदायी पेन्शन योजना ( डि.सी.पी.एस ) आणि २०१५ वर्षानंतर रूपांतरित झालेली राष्ट्रीय पेन्शन योजना (एन.पी.एस) लागू करण्यात आली आहे. गेल्या १६ वर्षात केंद्र शासनाने या एन.पी.एस योजनेत काही कालसुसंगत बदल केले आहेत. त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. त्यामुळे एन.पी.एस धारक वर्गीय कर्मचारी संतप्त आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बालेवाडीत स्लॅब कोसळल्याची घडली घटना; 8 जण जखमी

या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे शासनाचा लक्षवेध करण्यासाठी एन.पी.एस हटाव या एकाच मागणीसाठी राज्यातील १२ लाख सरकारी, निम सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलन केले. यावेळी शिक्षक भारती संघटनेने राजेंद्र झाडे,यांचे नेतृत्वात काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येऊन एन.पी.एस हटावच्या मागणीला पाठिंबा दिला. याशिवाय राजेंद्र झाडे यांच्या नेतृत्वात राज्य संयुक्त कार्यवाह दिलीप तडस राज्य संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर, विभागीय कार्यवाह सपन नेहरोत्रा, राज्य संयुक्त संघटक किशोर वरभे, शहर अध्यक्ष भारत रेहपाडे, जिल्हाकार्यवाह दीपक नागपुरे, उपाध्यक्ष देविदास नंदेश्वर, जिल्हा संघटक पंढरी मस्की, तालुका सचिव विश्वास बोरकर व पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com