'कॅटरीना'ने फुलविले बोर अभयारण्याचे पर्यटन, कारई' पॉईंट पर्यटकांचे आकर्षण

बोर अभयारण्य
बोर अभयारण्यgoogle

हिंगणा (जि. नागपूर) : नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर (nagpur wardha border) हिंगणा तालुक्यालगत असलेला बोर अभयारण्य प्रकल्पाचे (bor wildlife sanctury) पर्यटन ‘कॅटरीना’ नामक वाघिणीने फुलविले आहे. अन्य वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात असल्याने पर्यटकांची पसंती या अभयारण्याला आहे. अभयारण्यातील ‘कारई' संरक्षण कुटी हा पॉईंट पर्यटकांसाठी आकर्षण ठरला आहे. (caterina tigress give new identity to bor wildlife sanctury)

बोर अभयारण्य
नागपूरचं पाणी मुद्दाम अडविले? सरकारची निविदा काढण्यास दिरंगाई

बोर अभयारण्याचे क्षेत्रफळ १३८.१२ स्क्वेअर किलोमीटर आहे. नागपूर जिल्ह्यातील पर्यटकांना हिंगणा तालुक्याच्या ठिकाणाहून बोर अभयारण्यात सफारी करता यावी, यासाठी आमदार समीर मेघे यांनी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे रेटा लावून बोर अभयारण्याचे अडेगाव प्रवेशद्वार सुरू केले. या प्रवेशद्वारातून पर्यटक मोठ्या प्रमाणात बोर अभयारण्याच्या जंगल सफारीला जाऊ लागले. बोर अभयारण्याच्या वन्यजीव विभागाने या ठिकाणी गाईड्स ठेवले आहे. सफारी करण्यासाठी खुल्या जिप्सी सुद्धा आहेत.

बोर अभयारण्यात कॅटरीना नामक वाघिण (टी-३) अनेक वर्षापासून वास्तव्याला आहे. बाजीराव नावाच्या वाघापासून तिने आपला संसार फुलविला आहे. तिला आत्तापर्यंत चार ते पाच बछडे झाले आहेत. यामुळे सद्यपरिस्थितीत नर वाघ (टी-८)व (टी-१०) आहे, तसेच वाघिण (टी-१) असून तिला एक बछडा सुद्धा आहे. मधल्या काळात बाजारगाव रोडवर एका वाहनाच्या अपघातात बाजीरावचा मृत्यू झाला होता. कॅटरिनाच्या संसारामुळे खऱ्या अर्थाने बोर अभयारण्याला ओळख मिळाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पर्यटकांचे आकर्षण आता ‘कॅटरिना’ झाली आहे. याव्यतिरिक्त अभयारण्यात बिबट, हरिण, सांबर, अस्वल, निलगाय, मोर, रानकुत्रे, रानगवे सुद्धा आहेत.

बोर अभयारण्यात विशेष प्रकारच्या जातीचे गवत मोठ्या प्रमाणात आहे. यात मारवेल, मोतीचूर, भुरबुशी, दीनानाथ, कुसळ, कचई, कुंदा या प्रजातीचा समावेश आहे. यामुळे तृणभक्षक प्राणी मोठ्या प्रमाणात या अभयारण्यात दिसून येतात. बोर अभयारण्यात बोर धरण आहे. वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी धरण सक्षम आहे. बोर धरणाजवळ खस गवताची लागवड करण्यात आली आहे.

का आवडतो `कारई’ प्वाइंट?

अडेगाव प्रवेशद्वारावरून जाण्यासाठी बोर अभयारण्यात कच्चा रस्ता आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणात या प्रवेशद्वारावरून बोर अभयारण्य पर्यटनासाठी जातात. अभयारण्यात पहाडावर ‘कारई' संरक्षण कुटी उभारण्यात आली आहे. ही कुटी पहाडावर असल्याने या ठिकाणाहून संपूर्ण अभयारण्याचे दृश्य डोळ्यात टिपता येते. यामुळे पर्यटकांना हा पॉईंट खूपच आवडतो.

कोरोनामुळे यावर्षी केवळ मार्च महिन्यात अडेगाव प्रवेशद्वार सुरू करण्यात आले. मात्र, महिनाभरानंतर पुन्हा प्रवेशद्वार बंद करण्याचे आदेश आले. आता पावसाळा सुरू असल्याने जंगल सफारी बंद झाली आहे. पावसाळा संपताच पुन्हा पर्यटकांसाठी पर्वणी असलेले बोर अभयारण्याचे अडेगाव प्रवेशद्वार सुरू होणार असल्याची माहिती वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com