central hall will in legislative building Two buildings constructed expenditure expected thousand crore nagpur
central hall will in legislative building Two buildings constructed expenditure expected thousand crore nagpur sakal

Nagpur News : विधानभवनात होणार सेंट्रल हॉल! दोन भव्य इमारतीही उभ्या राहणार; हजार कोटीवर खर्च अपेक्षित

अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी अडथळा ठरत असलेला सेंट्रल हॉल आता नागपुरात होणार आहे.

Nagpur News: अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी अडथळा ठरत असलेला सेंट्रल हॉल आता नागपुरात होणार आहे. सेंट्रल हॉलच्या कारणामुळे दोन वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याचे नाकारण्यात आले होते. परंतु, आता हा अडथळा दूर होणार आहे. सोबतच दोन भव्य इमारतींचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

भविष्यात विधानसभा व विधान परिषदेतील सदस्यसंख्येत वाढ होणार आहे. ही संख्या लक्षात घेता बैठकव्यवस्था तयार करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. येथे दोन उंच इमारतीही तयार करण्याचे प्रस्तावित आहे. जवळपास १५-१५ माळ्यांच्या या इमारती असतील. सर्व महत्त्वाचे विभाग या इमारतीत राहतील.

यावर एक हजार कोटीच्यावर खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाचे प्राथमिक स्तरावरील सादरीकरण विधानसभा अध्यक्षांसमोर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. यासाठी विधानभवन परिसरातील सर्वच पक्ष कार्यालयासोबत ग्रंथालय व इतर काही इमारती तोडण्यात येतील. येथे एक सेंट्रल भव्य सेंट्रल हॉल तयार करण्यात येईल, अशीही माहिती मिळते.

सेंट्रल हॉलअभावी झाले नाही अधिवेशन

विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात होते. आतापर्यंत सर्वाधिक वेळा हिवाळी अधिवेशन झाले. मोजक्याच वेळा पावसाळी अधिवेशन घेण्यात आले. उपराजधानीचा दर्जा असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी अनेकदा झाली आहे. परंतु आतापर्यंत एकदाही अधिवेशन झाले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याची घोषणा केली होती. परंतु सेंट्रल हॉल नसल्याचे कारण देत अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच घेण्यात आले.

राज्यपालांचे अभिभाषण

वर्षातील पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरवातीला राज्यपाल अभिभाषण करतात. यावेळी विधानसभा व विधान परिषदेतील सदस्य उपस्थित असतात. विधानसभेतील सदस्य विधान परिषदेत तर विधान परिषदेतील सदस्य विधानसभेत जाऊ शकत नाही. त्यामुळे दोन्ही सभागृहातील सदस्य या सेंट्रल हॉलच्या ठिकाणी एकत्र येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com