पोलिस अधीक्षकाला चॅलेंज करणाऱ्याला बिहारमधून अटक

पोलिस अधीक्षकाला चॅलेंज करणाऱ्याला बिहारमधून अटक

नागपूर : ‘हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा’ असे चॅलेंज फरार आरोपीने भागलपूरच्या पोलिस अधीक्षकाला फेसबुकवरून केले होते. त्या कुख्यात आरोपीला नागपूर पोलिसांनी अटक केली. मोहम्मद तनवीर मंजूर आलम (३०, रा. असांदपूर उर्दू शाळेमागे, भागलपूर-बिहार) असे आरोपीचे नाव आहे.

तनवीर याच्यावर भागलपूर येथे गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात तो भागलपूर पोलिसांच्या हाती लागला नव्हता. ७ जानेवारी २०१७ रोजी रात्री ९ च्या सुमारास त्याने फेसबुकच्या माध्यमातून ‘भागलपूर के एसपी को चॅलेंज. राका को पकड कर दिखा दे. राका वापिस आ रहा है. हिसाब किताब लेने के लिए. आय विटनेस राका तनवीर’ अशी पोस्ट टाकून त्याने भागलपूर पोलिसांना आव्हान दिले होते.

पोलिस अधीक्षकाला चॅलेंज करणाऱ्याला बिहारमधून अटक
रात्रीच्या अंधारात बोकड चोरला, कापला अन् मालकालाच विकला

त्यानंतर तो भागलपूर येथून फरार झाला. याप्रकरणी भागलपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तनवीरचा शोध सुरू केला होता. परंतु, तो पोलिसांच्या हाती लागला नाही. २०१८ मध्ये भागलपूर न्यायालयाने तनवीरच्या विरोधात अटक वॉरंट देखील काढले होते. परंतु, तो पोलिसांना मिळून आला नव्हता.

शिंप्याकडे करीत होता काम

भागलपूर येथून पळून आल्यानंतर तो डोबी परिसरात शिंप्याकडे कामाला लागला. रेडीमेड कपडे शिवून तो उपजीविका करायचा. भागलपूर येथील २० ते २५ जण डोबी परिसरात रहात असून, त्यात एक गुन्हेगार आपले नाव बदलवून राहतो, अशी माहिती युनिट तीनच्या पथकाला मिळाली होती. त्याला सापळा रचून अटक केली आणि भागलपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी पीआय प्रदीप रायन्नावार यांच्या पथकाने केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com