Chandrapur Triple Murder Case: मौशीतील तिहेरी हत्याकांड प्रकरण,पत्नीसह दोन मुलींचा खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयीन कोठडी

Maushi Husband killed Wife and two Daughter: नागभीड तालुक्यातील मौशी येथे झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी अंबादास तलमले याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
Chandrapur
Chandrapur Esakal

Chandrapur Triple Murder Case: नागभीड तालुक्यातील मौशी येथे झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी अंबादास तलमले याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची रवानगी चंद्रपूर येथील कारागृहात करण्यात आली. आरोपीवर ३०२ कलमाअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी आई, दोन मुलींवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

रविवारी दारुड्या अंबादासने पत्नी अलका, मुलगी प्रणाली आणि तेजस्विनी यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या घटनेने जिल्हा हादरून गेला. याप्रकरणी पोलिसांनी अंबादास तलमले याला अटक केली. या घटनेत मुलगा पानटपरीवर गेल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेमुळे त्याची प्रकृती खालावली आहे. त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. (Latest Marathi News)

रविवारी सायंकाळी तिघांवरही सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोपी अंबादासला न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विजय राठोड करीत आहेत.

Chandrapur
Spanish Travel Vlogger's Assault Case: बलात्कार पीडित स्पॅनिश महिलेच्या पतीला 10 लाखांची भरपाई, पोलिसांच्या तत्परतेबाबत दाम्पत्याने मानले आभार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com