Legislative Council Elections : चंद्रशेखर बावनकुळेंच्या उमेदवारीवर तब्बल नऊ तास सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrashekhar bawankule

चंद्रशेखर बावनकुळेंच्या उमेदवारी अर्जावर तब्बल नऊ तास सुनावणी

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : विधान परिषदेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्जासोबत दिलेले शपथपत्र बदलल्यासह अनेक आक्षेप काँग्रेसचे उमेदवार रवींद्र भोयर यांनी घेतले. जवळपास नऊ तास यावर सुनावणी चालली. बावनकुळे यांनी शपथपत्र बदलले नसून अतिरिक्त माहिती जोडल्याचा निर्वाळा देत जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांनी आक्षेप फेटाळून लावले.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संघ मतदार संघासाठी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यासाठी पाच उमेदवारांनी अर्ज भरले. त्याची छाननी बुधवारी करण्यात आली. पाचही उमेदवारांचे अर्ज वैद्य ठरविले आहे. तत्पूर्वी, काँग्रेस उमेदवार भोयर यांनी भाजप उमेदवार बावनकुळे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला. कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवस्थानचे प्रमुख असून त्यांनी ही माहिती शपथपत्रात दिली नाही. नंतर त्यांनी त्यात सुधारणा करून नवीन शपथपत्र दिले. न्यायालयात असलेल्या खटल्यांची पूर्ण माहिती दिली नाही. मुलगा संकेत याचा अवलंबित म्हणून कुठेही उल्लेख नाही. त्यांच्या पत्नीच्या नावे एक हॉल असून वस्तू व सेवा कर रकाना निरंक दाखविण्यात आला असल्याचे आक्षेप त्यांनी नोंदविले.

हेही वाचा: ...अन् मध्यरात्री आईला मुलगी प्रियकरासोबत दिसली नको त्या अवस्थेत

बावनकुळे यांच्याकडून राजेश गोल्हर व ॲड. अमित बंड तर भोयर यांच्याकडून सत्यजित दस्तुरे, नितीन दहीकर व सुरज लोलगे यांनी म्हणणे मांडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर उपस्थित होत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ११ वाजता सुनावणी सुरू झाली. रात्री सव्वा आठपर्यंत ही सुनावणी चालली.

भोयर यांच्याकडील सर्व आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकूण घेतले. काही ठिकाणी त्यांची अडचण झाल्याने वरिष्ठ पातळीवरून त्यांनी मार्गदर्शन घेतल्याचे सूत्रांकडून समजते. जवळपास ९ तास सुनावणी घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आक्षेप फेटाळून लावत बावनकुळे यांचे अर्ज स्वीकारला.

हेही वाचा: दारूसोबत चकणा म्हणून या पदार्थांचे तर सेवन करत नाही ना?

नियमांची पायमल्ली!

अर्ज दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांचे शपथपत्र हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर लावणे आवश्यक आहे. या निवडणुकीत पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. परंतु एकाही उमेदवाराचे शपथपत्र कार्यालयाबाहेर दर्शनी भागात लावण्यात आले नाही. त्यामुळे निवडणूक विभागाकडून नियमांचा पायमल्ली करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.

जगदंबा देवस्थानबाबतची माहिती भाजप उमेदवार बानवनकुळे यांच्या शपथपत्रात नव्हती. त्यांनी सुधारित शपथपत्र दिले. निवडणूक निर्णय अधिकारी हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दबावात काम करीत आहे. नियमबाह्य काम होत असल्याने याच्या विरोधात न्यायालयात दाद मागू.
- रवींद्र भोयर, उमेदवार, काँग्रेस

पाचही अर्ज वैध

चंद्रशेखर बावनकुळे (भाजप), रवींद्र भोयर (कॉंग्रेस), प्रफुल्ल गुडदे (कॉंग्रेस), मंगेश देशमुख (अपक्ष),सुरेश रेवतकर (अपक्ष) या सर्व पाचही उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.

loading image
go to top