esakal | मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री झारीतील शुक्राचार्य, बावनकुळेंचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

बावनकुळे

''मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री झारीतील शुक्राचार्य''

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी आतापर्यंत ओबीसी आरक्षणाबाबत (obc reservation) एकही शब्द बोलले नाहीत. पुढच्या निवडणुकीमध्ये ओबीसींना डावलून धनदांडग्यांना सत्तेत आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यांना ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, असा गंभीर आरोप माजी ऊर्जामंत्री आणि ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे (bjp leader chandrashekhar bawankule) यांनी केला. आज त्यांच्या नेतृत्वात नागपुरातील बडकस चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. (chandrashekhar bawankule criticized cm uddhav thackeray and deputy cm ajit pawar)

हेही वाचा: निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या सदस्यास मारहाण

विधानसभेत गोंधळ घातल्यावरून भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. त्यावरून भाजप चांगलेच आक्रमक झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून नागपुरातील बडकस चौकात माजी ऊर्जामंत्री चंद्रेशखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. याठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून राज्य सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जात आहे.

ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचा कट राज्य सरकारने रचलेला आहे. त्यामुळे कट रचून १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच आंदोलनामध्ये हळूहळू गर्दी वाढत असल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. तसेच हा वर्दळीचा परिसर आहे आणि कार्यकर्त्यांनी चौकात आंदोलन केल्यामुळे वाहतूक देखील खोळंबली आहे. यावेळी पुतळा जाळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

loading image