esakal | ...अन्यथा राज्यकर्त्यांना फिरू दिले जाणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

chandrashekhar bawankule

...अन्यथा राज्यकर्त्यांना फिरू दिले जाणार नाही

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत (OBC reservation) घेतलेली भूमिका केवळ बनवाबनवी असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री तसेच भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (BJP's state general secretary Chandrashekhar Bawankule) यांनी पत्रकार परिषदेत केला. एक महिन्याच्या आत आरक्षणाचा निर्णय घ्यावा अन्यथा राज्यकर्त्यांना फिरू दिले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (Chandrashekhar-Bawankule-said-Mahavikas-Aghadi-is-doing-politics-of-OBC-reservation)

ओबीसींच्या मुद्यावर मंत्री छगन भुजबळ आंदोलन करतात. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार महिनाभरात डाटा तयार करू असे सांगतात. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फाईल्सवर स्वाक्षऱ्या करीत नाही. सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, निवडणूक आयोगाने ओबीसींसाठी आयोग स्थापन करण्याची सूचना केली. यानंतरही १४ महिने सरकारने काही केले नाही.

हेही वाचा: धोका वाढला! 'मेडिकल'च्या कोविड वॉर्डात दहा मुले भरती

फडणवीस सरकारच्या काळातील आरक्षण महाविकासआघाडीने घालवले आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खोटे बोलून आरोप करतात, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली. महिनाभरात डाटा तयार केल्यास ओबीसींना आरक्षण मिळू शकते. मात्र, नुसते राजकारण चालले आहे. ओबीसी समाजाला मूर्ख समजू नका, रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.

केदारांचे वागणे अयोग्य

आमदार टेकचंद सावरकरांना शासकीय बैठकांमध्ये बोलू न देणे, त्यांची मुस्कटदाबी करणे असे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांचे वागणे अयोग्य आहे. लोकप्रतिनिधींना वारंवार डावलणे, अवमान करणे सहन केले जाणार नाही. यापुढे असे प्रसंग घडल्यास सडेतोड उत्तर दिले जाईल. या घटनेविरोधात जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

(Chandrashekhar-Bawankule-said-Mahavikas-Aghadi-is-doing-politics-of-OBC-reservation)

loading image