esakal | पाडव्याला मटणाला नव्हे चिकनला पसंती; ऑनलाइन बुकिंगही जोरात
sakal

बोलून बातमी शोधा

After six months the price of chicken crossed two hundred mark Nashik News

पाडव्याला मटणाला नव्हे चिकनला पसंती; ऑनलाइन बुकिंगही जोरात

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : पोळ्याचा पाडवा म्हणजे नागपूरकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय. एक महिना नॉनव्हेज न खाल्याने फक्त चिकन, मटणावर ताव मारणे. कारण दोनच दिवसांनी गणेशोत्सव असल्याने मंगळवारी सकाळपासूनच चिकन, मटण शॉप बाहेर लोकांनी गर्दी होण्याची शक्यता आहे. पोळ्याला मटणापेक्षा चिकनला अधिक मागणी राहत असल्याने शहरात अंदाजे दोन लाख किलो चिकनची तर ७० लाख किलो मटणाची विक्री होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळीच रांगा लागण्याची शक्यता असल्याने अनेकांनी आजपासून बुकिंग करून ठेवले आहे. ऑनलाइनही विक्री केली जात आहे.

गुरुवारपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे अनेकांनी पार्टीचा बेत आखला आहे. नागरिकांसोबत आज हॉटेल, केटरिंग व्यावसायिकांनी देखील बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा चिकन, मटणाच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपराजधानीतील सावजीचे नाव जगभर असल्याने याच शहरात पाडवा उत्साहात साजरा केला जाणार आहे. तब्बल सव्वा महिन्यानंतर आलेल्या पाडव्याची कर मांसाहारप्रेमींसाठी अत्यंत आनंदाची जाईल, यात शंका नाही.

हेही वाचा: नागपूर : कोरोनाची तिसरी लाट?, वीकएंड लॉकडाऊनची घोषणा

पोळ्याच्या पाडव्याला मटणापेक्षा चिकनला अधिक मागणी असते. त्यामुळे चिकनच्या दुकानात अधिक कोंबड्या दिसत आहेत. कोबडींचे खाद्य वाढले असले तरी चिकनच्या दरात हवी तेवढी वाढ झालेली नाही. होळीला शासकीय सुटी असल्याने पोळ्याच्या पाडव्यापेक्षा मांसाहाराला अधिक मागणी असते.
- हरीश पराते, संचालक, धोटे चिकन सेंटर
मटणाचे भाव वाढलेले आहे. तसेच ग्राहकांच्या खिशातील पैसाही कमी झालेली आहे. पोळ्याला मटणाला नव्हे तर चिकनला अधिक मागणी असते. त्यामुळे मोजकेच मटण आम्ही आणतो.
- विक्की दुर्गे, संचालक गुड्डू मटण शॉप

हेही वाचा: विजय वडेट्टीवार म्हणाले, एका बापाची अवलाद असशील तर...

चिकनपूर्वीचे दर (प्रतिकिलो) पाडव्याचे दर

  • कॉकरेल २५० रुपये - २८० रुपये

  • गावरानी ६०० रुपये - ६०० रुपये

  • बॉयलर १८० रुपये २०० रुपये

  • लेगॉन १३० रुपये १५० रुपये

  • हैदराबादी गावरानी - ३०० रुपये - ३०० रुपये

  • मटण (बोकडाचे) ७०० रुपये- ७०० रुपये

  • शहरातील दुकानांची संख्या - ४५०

सावजीही फुलणार

श्रावणमासात ओस पडलेल्या सावजी भोजनालयांत पाडव्यापासून पुन्हा रंगत वाढणार आहे. श्रावणमासात सावजींचा व्यवसाय ओस पडला होता. आता श्रावणमास संपल्याने नव्या जोमाने सर्वच सावजी कामाला लागले आहेत.

loading image
go to top