महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा अपघाती मृत्यू

ghugal.jpg
ghugal.jpg
Updated on

नागपूर : महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास नागपूर रेल्वे स्टेशनच्या मुंबई एन्डकडील आरआरबी केबीनजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास 52 वर्षीय घुगल शासकीय वाहनाने रेल्वेस्थानकावर आले. त्यांनी चालकाला माझा मित्र येणार आहे थोड्या वेळाने येतो, तू पार्किंगमध्ये थांब, असे सांगितले आणि ते निघून गेले. त्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून ते चालत गेले. त्यासुमारास एक मालगाडी तेथून निघाली. ती पूर्णपणे निघून गेल्यानंतर घुगल तडफडताना आढळले. त्यांचे दोन्ही पाय मांडीपासून कटलेले होते. माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. त्यांच्याकडे आढळून आलेल्या पाकिटात पैसे, ओळखपत्र व अन्य साहित्य होते. तसेच मोबाईलही त्यांच्या खिशात होता.

ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवर आलेल्या फोनने ते घुगल असल्याचे स्पष्ट झाले. लोहमार्ग पोलिसांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घुगल यांच्या गाडीच्या चालकाला घटनेबाबत माहिती दिली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. परंतु याबाबत अधिक स्पष्टता होऊ शकली नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com