"आई मला खेळायला जायचंय, जाऊ दे गं"; मुलांच्या हट्टामुळे वाढली पालकांची डोकेदुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"आई मला खेळायला जायचंय, जाऊ दे गं"; वाढली पालकांची डोकेदुखी

"आई मला खेळायला जायचंय, जाऊ दे गं"; वाढली पालकांची डोकेदुखी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनात (Coronavirus) शाळा बंदमुळे जायबंदी झालेल्या मुलांनी आता घराबाहेर पडण्याचा हट्ट धरला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेच्या (Third wave of corona) भीती पालकांच्या मनात भीतीने घर केले आहे. आपण घराबाहेर पडत असलो तरी घराबाहेर पडण्याचा मुलांचा हट्ट कसा पुरवायचा,अशा द्विधा मनःस्थितीमध्ये पालक सापडले आहेत. (Children are asking to go out of house to parents )

हेही वाचा: महापालिकेनं खासगी कंपनीला दिलेले ४६ लाख पाण्यात? जनजागृतीच नाही

उन्हाळ्याच्या सुट्या म्हणजे बच्चे कंपनीची चंगळ. अभ्यासाचे टेन्शन सोडून मनसोक्त खेळण्याचे दिवस. बरेचजण बाहेरगावी नातेवाइकांकडे किंवा फिरण्यासाठी जातात. पण, सलग उन्हाळ्यात कोरोनाने कहर केला. संपूर्ण जगालाच जायबंदी केले. सुमारे ५० दिवसांपासून नागपूरकरही घरातच बंदिस्त आहेत. मुलांनाही चार भितींआडच दिवस घालवावे लागत आहेत. काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील कोरोनारुग्णांचा आलेख कमी होऊ लागला आहे. त्यासोबत भीतीही काहीशी कमी झाली.

नागपूरकर घराबाहेर पडू लागले आहेत. वडीलधाऱ्यांचे अनुकरण करणाऱ्या लहान मुलांचाही घराबाहेरचे जग खुणावू लागले आहे. फार लांब नाही, पण किमान घराजवळ खेळायला जाऊ देण्याचा हट्ट घराघरांतून सुरू आहे. काहींनी नेहमीप्रमाणे आजी, आत्या, मामा, मावशीकडे सोडून देण्याचा हट्ट धरला आहे. मुलांचे रुसवे, फुगवे काढण्यासाठी पालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

क्रियेटिव्हिटीच जायबंदी

तिसरी लाट मुलांसाठी अधिक घातक ठरणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. यामुळे मुलांची काळजी आत्तापासूनच घेतली जात आहे. त्यांना हवे नको ते घरीच मिळते. पण, अगदी दाराबाहेरही पडू दिले जात नाही. बालपण क्रियेटिव्हिटी डेव्हलप होण्याचा काळ. परंतु, कोरोनाच्या भीतीने क्रियेटिव्हिटीलाच जायबंदी करून टाकले आहे.

सामाजिकीकरण ही आपली गरज आहे. शाळा, खेळण्यातून मुलांचे सामाजीकरण होत असते. हे सर्व मुले मिस करीत आहेत. घरात २४ तास हे करू नको, ते करू नको, असे मुलांना ऐकवले जाते. अशात बाहेर जाऊन खेळण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे.
सरिता मोडक, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व कौन्सिलर

हेही वाचा: गडचिरोलीत पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक; १३ नक्षलवाद्यांचा खात्मा

पप्पा सकाळ, सायंकाळ घराबाहेर पडतात. मला मात्र मित्रांसोबत खेळायला जाऊ देत नाहीत. माळीवरूनच शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीसोबत काहीवेळ गप्पा मारते. पण, शिवाशिवी, लगोरी, हाईड अॅण्ड सिकची मजा त्यात नाही.
-माही लांबट, इयत्ता ३ री.

(Children are asking to go out of house to parents )

loading image
go to top